Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत खानापूर तालुका समितीच्या वतीने निवेदन सादर

  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत आणि मराठी नामफलकाबाबत तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, हेस्कॉम, आरोग्य विभाग आणि बस व्यवस्थापक यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज दि. 30 जून रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, पावसामुळे तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून दैनंदिन वाहतूक …

Read More »

इंगळगी मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा; भाजप-श्रीराम सेनेची मागणी

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळगी येथे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी करत भाजप आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात जोरदार निदर्शने केली. आज बेळगावातील एसपी कार्यालयासमोर भाजप आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हुक्केरी तालुक्यातील इंगळगी येथे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत निदर्शने केली. …

Read More »

बेळगावसह कर्नाटकातील चार विमानतळांना धमकीचा ईमेल!

  बेळगाव : कर्नाटकातील चार प्रमुख विमानतळांना बॉम्ब स्फोट घडवून उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली. बेळगाव, हुबळी, मंगळुरू आणि बेंगळुरू या कर्नाटकातील विमानतळांना बॉम्ब स्फोट घडवून उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल विमानतळांच्या संचालकांना पाठवण्यात आला. त्यामुळे सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. “रोडकिल क्यो” नावाच्या ईमेल आयडीवरून सदर …

Read More »

नेगील योगी रयत सेवा संघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : नेगील योगी रयत सेवा संघ कर्नाटक बेळगाव शाखा यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सहाय्यकानी शेतकऱ्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला व सदर निवेदन लवकरात लवकर शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात …

Read More »

इंगळगी मारहाणी प्रकरणी चार जणांना अटक

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणी चार जणांना गजाआड करण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली. पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, काल हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याचा …

Read More »

ठाकरे बंधू एकत्र येणार, शनिवारी मनसे-शिवसेनेचा विजयी मेळावा

  मुंबई : अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हिंदी सक्ती विरोधात मिळालेला विजय साजरा करण्यासाठी दोघेही एकत्र येत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषदेनंतर याबाबत संकेत मिळाले आहेत. ५ जुलै रोजी मुंबईमध्ये ठाकरे बंधू विजयी जल्लोष साजरा करणार आहेत, …

Read More »

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ३ जुलै रोजी हुक्केरी बंदचा इशारा

  हुक्केरी : अवैध गो तस्करी करणाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ३ जुलै रोजी हुक्केरी बंदचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली “चलो इंगळगी” निषेध रॅली काढण्यात येणार आहे. श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांनी या संदर्भात बोलताना …

Read More »

वज्र धबधबा पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांचा आमटे क्रॉसजवळ अपघात : दुचाकी चालकाचा मृत्यू

  खानापूर : तालुक्यातील परवाड गावाजवळचा वज्र धबधबा पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीने 407 मालवाहू वाहनाला समोरासमोर धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आणि मागे बसलेला गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी बेळगाव-चोर्ला महामार्गावरील आमटे क्रॉसजवळ घडली. हुबळी तालुक्यातील रेवडीहाळ येथील रहिवासी दर्शन मौनेश चव्हाण (23), रविवारी त्याचा मित्र रघु कल्लप्पा …

Read More »

हवेत गोळ्या झाडून साजरा केला वाढदिवस; ग्रामपंचायत सदस्याला अटक

  बेळगाव : बेळगावमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याने सार्वजनिकरित्या हवेत गोळ्या झाडल्या, हातात चाकू धरून बेधुंद होऊन वाढदिवस साजरा केला. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची शहरात एका ग्रामपंचायत सदस्याने गुंडासारखे वर्तन केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाबाजान खलीमुंडसाई यांनी हवेत गोळ्या झाडून, हातात चाकू धरून आणि बेधुंद …

Read More »

जुगार अड्ड्यावर छापा: १२ आरोपींना अटक

  बेळगाव : जुगार सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकला आणि १२ आरोपींना अटक केली. अंदरबाहर खेळत असल्याची माहिती मिळाल्याने बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय संतोष दलवाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नंदीहळ्ळी गाव हद्दीतील वाकडेवड रोडवरील रवी टोपकर यांच्या शेतात छापा टाकला आणि १२ आरोपींना अटक करण्यात आली. गोविंद परशुराम चौगुले, सूरज …

Read More »