Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

त्रिभाषा सूत्राचा निर्णय मागे घेताच 5 जूलैचा मोर्चा रद्द

  मुंबई : राज्य सरकारकडून त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता पाच जुलै रोजी निघणारा मोर्चा देखील रद्द करण्यात आला आहे. याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. राज्यात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिली पासून हिंदी सक्ती नको अशी भूमिका राज्यातील …

Read More »

हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही जीआर रद्द; महाराष्ट्रात फक्त मराठीच!

  मुंबई : हिंदी सक्तीबाबतचा शासन निर्णय रद्द करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सरकारने काढलेले दोन्ही जीआर रद्द केले जाणार आहेत. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार, त्या समितीचा निर्णय आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. हिंदी भाषा ही ऐच्छिक आहे, तर …

Read More »

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण

बेळगाव : गायींची अवैध तस्करी करण्यासंदर्भात जाब विचारण्यास गेल्याच्या कारणावरून हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीरामसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी, गायींची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी गायींची वाहतूक करणारे …

Read More »

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग

  बेळगांव : शिवाजी रोड कोनवाळ गल्ली येथे रविवारी झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात बेळगांवकरांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. एंजल फाउंडेशन, हिरकणी महिला मंडळ आणि राजा शिवछत्रपती युवक मंडळ या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धार्थ नेत्रालय आणि विजय ऑर्थो सेंटर या आघाडीच्या वैद्यकीय संस्थांच्या …

Read More »

तनिष्का काळभैरव हिची विजयी घोडदौड सुरूच!

  बेळगाव : ताश्कंद येथील जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत (डब्ल्यूटीटी) रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविल्यानंतर बेळगावच्या तनिष्का काळभैरव हिने स्वीडन आणि नॉर्वेमध्ये रौप्य पदके जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवीन आत्मविश्वास आणि धारदार कौशल्यांसह भारतात परतताना तनिष्का हिने बेंगलोर येथे झालेल्या दुसऱ्या कर्नाटक राज्य …

Read More »

सक्षम स्पोर्ट्स एरिनाच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स अजिंक्य!

  बेळगाव : बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील सक्षम स्पोर्ट्स एरिना या क्रीडा संस्थेतर्फे आयोजित 14 वर्षाखालील बाद पद्धतीच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने पटकावले आहे. सदर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी ज्योती सेंट्रल हायस्कूलचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला विजेत्या सेंट झेवियर संघातर्फे अरकन …

Read More »

प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांची कला शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती

  बेळगाव : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. चंद्रकांत वाघमारे यांची राणी चन्नम्मा विद्यापीठातील कला शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती कर्नाटक राज्य सरकार विद्यापीठ विधायक-2000, परिच्छेद 21(1) च्या नियमानुसार करण्यात येते. डॉ.चंद्रकांत वाघमारे हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून मराठी विभागात सेवा बजावत असून विद्यापीठातील अनेक समित्यावर …

Read More »

उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री महामार्गावर ढगफुटी; १७ जण बेपत्ता

  उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १७ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेची माहिती समजताच एसडीआरएफ, स्थानिक …

Read More »

भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेत चेंगराचेंगरी, ३ जणांचा मृत्यू

  ओडिसा : ओडिसामध्ये सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेदरम्यान रविवारी आज श्रीगुंडिचा मंदिरासमोर पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेत तीन भक्तांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर १० ते १२ भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जणांची …

Read More »

जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मण्णूरमार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

  बेळगाव : जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर संचलित, जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मण्णूर मार्फत मण्णूर गावातील मराठी प्राथमिक शाळा व कन्नड प्राथमिक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फौंडेशनचे अध्यक्ष एल के कालकुंद्री सर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती फोटोचे …

Read More »