Monday , April 20 2026
Breaking News

प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांची कला शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. चंद्रकांत वाघमारे यांची राणी चन्नम्मा विद्यापीठातील कला शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती कर्नाटक राज्य सरकार विद्यापीठ विधायक-2000, परिच्छेद 21(1) च्या नियमानुसार करण्यात येते. डॉ.चंद्रकांत वाघमारे हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून मराठी विभागात सेवा बजावत असून विद्यापीठातील अनेक समित्यावर त्यांनी काम केले आहे. पदव्युत्तर जिमखाण्याचे अध्यक्ष, रेड क्रॉस नोडल अधिकारी, अनुसूचित जाती-जमाती कोशचे विशेषाधिकारी, अभ्यास मंडळाचे सदस्य-अध्यक्ष, के -सेट परीक्षेचे नोडल अधिकारी, विद्यापरिषद व सिंडिकेट सदस्य, परीक्षा मंडळ, अभ्यास मंडळ, डॉक्टरल समितीचे सदस्य-अध्यक्ष, भाषा शाखेचे निर्देशक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे निर्देशक आणि मराठी विभागाचे प्रमुख म्हणून तीन वेळा त्यांनी सेवा बजावली आहे. डॉ. वाघमारे यांच्या नावावर आठ पुस्तके प्रकाशित झाली असून सहा पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. त्यांचे पासष्ट शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदांमधून शोधनिबंध सादर केले असून ते बीजभाषक म्हणूनही अनेकवेळा उपस्थित राहिले आहेत. डॉ.वाघमारे हे कर्नाटक विद्यापीठ,धारवाड, गुलबर्गा विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद आणि मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर-अमरावती येथील अभ्यास मंडळावर कार्यरत आहेत. डॉ.वाघमारे यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शैक्षणिक मूल्यांकन समिती, नॅक पीर समितीवरही अनेकवेळा सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांना साहित्यिक शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *