Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

मुगळीत भिंत कोसळून तीन ठार

जरळी (गडहिंग्लज) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे आज (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने पोल्ट्री शेडची भिंत कोसळून एका पुरुषासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबतची माहिती अशी, अजित अर्जुन कांबळे (वय ४८, रा. नांगनूर) त्यांची बहिण गिरीजा हिच्या पतीचे निधन झाले आहे. …

Read More »

सीडी प्रकरण सरकारने सोडले तरी आम्ही सोडणार नाही : शिवकुमार

बेंगळुरू : सरकारने लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्वरित लसीकरण सुरु करावे. सरकारने सीडी प्रकरण सोडून दिले तरी आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाचा पिच्छा पुरवून न्यायासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिला. यासदंर्भात हासन येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी राज्यात उदभवलेल्या कोरोना लसीच्या …

Read More »

समृद्धी सोसाटीच्यावतीने महालक्ष्मी केअर सेंटरला धनादेशाचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी): खानापूर शहरात कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची सोय व्हावी. यासाठी श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्या वतीने आयोजीत श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटरला सुरूवात करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला तालुक्यातुन अनेक दानशुर व्यक्तीनी वस्तू स्वरूपात अथवा अन्नधान्य स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच प्रमाणे खानापूर येथील समृध्दी …

Read More »

कर्नाटकातील लॉकडाऊन १४ जूनपर्यंत वाढवला

बंगळूर : राज्यात कोरोना संक्रमणाची संख्या कमी असली तरी, ग्रामीण भागामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. यामुळे लॉकडाऊन पुन्हा एक आठवड्याने वाढवण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य तज्ञ समितीने सरकारला दिला आहे. त्यामुळे १४ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा व काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत हा …

Read More »

नेटवर्कअभावी ग्रामस्थ व युवावर्ग अडचणीत…

विद्यार्थ्यांचे नुकसान तर ग्रामस्थांची कागदपत्राविना होतीये पायपीट चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यापासून कित्येक गावे नेटवर्कअभावी वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांना व युवावर्गाला नेटवर्कअभावी कोणतीही खाजगी स्वरूपाची कामे होत नाहीत, अत्यावश्यक व एखादी आपत्ती ओढवूल्यास बाहेर गावी व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क होत नाही, …

Read More »

खानापूर बीजेपी युवा मोर्चाच्यावतीने मदत

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका बीजेपी युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष किलारी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर येथील श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटरला तसेच खानापूर सरकारी दवाखान्याला, नंदगड सरकारी दवाखान्याला आदी ठिकाणी भेटी देऊन मास्क, रुग्णांना दुपारचे जेवन देऊन सहकार्य करण्यात आले.तसे खानापूर पोलिस कर्मचारी वर्गाला मास्कचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा बीजेपी उपाध्यक्ष प्रमोद …

Read More »

दिव्यांग व वृद्धांचे लसीकरण

बेळगाव : दिव्यांग, अंध आणि मतिमंद मुलांना तसेच वृद्धांना लस देण्याचा कार्यक्रमाला आ. अनिल बेनके यांनी चालना दिली. गुरुवारी शहरातील कोल्हापूर सर्कल जवळील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेमध्ये कोरोना लस देण्याच्या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यावेळी आ. अनिल बेनके बोलतांना म्हणाले की बेळगावमध्ये कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी अंध, मतिमंद व दिव्यांग लोकांना लस …

Read More »

“मेहुल चोक्सीला भारताकडं सोपवा”; डॉमिनिका सरकारची कोर्टाला विनंती

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारनं मोठा झटका दिला आहे. डॉमिनिकातील स्थानिक कोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान डॉमिनिका सरकारनं चोक्सीची याचिका सुनावणी योग्य नसून त्याला भारताकडे सोपवण्यात यावं असं म्हटलं आहे.  सुनावणीपूर्वी मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी म्हटलं की, …

Read More »

औद्योगिक वसाहतीतील पॉवरलूम कारखान्याला आग

प्राथमिक अंदाजानुसार ७ कोटींचे नुकसान : शॉर्टसर्किटने आग निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी -जत्राट रोडवर असलेल्या श्रीपेवाडी येथील औद्योगिक वसाहतमधील  पॉवरलूम टेक्सटाईल कारखान्याला बुधवारी (ता.2) रात्री उशिरा शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत रमेश चव्हाण बंधूंचा संपूर्ण कारखाना भस्मसात झाला आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे  7 कोटींचे नुकसान झाले आहे. …

Read More »

कानडी प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा ‘कोरोना’ ने मृत्यू

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील मराठी विद्यामंदिर कानडी शाळेचे अध्यापक राजेंद्र नारायण तुपे, वय ३९ यांचे कोरोनामुळे निधन झाले. या  घटनेने शैक्षणिक वर्तुळात घबराट पसरली आहे.      कानडी येथील कोरोना दक्षता कमिटीचे सदस्य असलेले तुपे आठ दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव आल्यापासून गडहिंग्लज येथे उपचार घेत होते. तथापि उपचार सुरू असताना …

Read More »