खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका बीजेपी युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष किलारी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर येथील श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटरला तसेच खानापूर सरकारी दवाखान्याला, नंदगड सरकारी दवाखान्याला आदी ठिकाणी भेटी देऊन मास्क, रुग्णांना दुपारचे जेवन देऊन सहकार्य करण्यात आले.
तसे खानापूर पोलिस कर्मचारी वर्गाला मास्कचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा बीजेपी उपाध्यक्ष प्रमोद कोेचेरी, तालका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, सुनिल मडीमनी, संतोष हडपद, प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, प्रदीप सानिकोप, रूद्रापा तुळोजी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …