Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने पाद्य पुजन व पाठ पुजन मोठ्या भक्तीभावात संपन्न

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने संकष्टी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पाचे पाद्य पुजन व पाठ पुजन मोठ्या भक्तीभावात संपन्न शनिवार दिनांक १४/६/२५ रोजी सायंकाळी ७ वाजता गल्लीतील जेष्ठ नागरिकांच्या वतीने पाद्य पुजन व पाठ पुजन करून महाआरती करण्यात आले. यावेळी सुहासिनी महिलांनी …

Read More »

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; ६ जणांचा अंत, अनेक पर्यटक बुडाल्याची भीती

मावळ ( पिंपरी चिंचवड): रविवार सुट्टीचा दिवस, पर्यटकांसाठी घातवार ठरला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळल्याने ६ जणांचा अंत झाला असून वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू …

Read More »

माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  बेळगाव : अलिकडच्या काळात बनावट कागदपत्रे तयार करून इतरांच्या मालमत्ता, घरे आणि जमीन विकणाऱ्या लोकांचे एक नेटवर्क जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत आहे. आता बनावट कागदपत्रे तयार करून माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांच्या मालकीची मालमत्ता लुटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून इतरांच्या मालमत्ता विकण्याचे रॅकेट जिल्ह्यात …

Read More »

सदलग्यात स्वा. सावरकर यांच्यावर डॉ. अमर अडके, डॉ. ज्योती चिंचणीकर यांचे व्याख्यान संपन्न

  सदलगा : येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अंदमानातील काळकोठडीतील राजकैद्याचे जीवन जगत असतानाच्या त्यांनी भोगलेल्या यातना, तसेच केवळ काळ्या पाण्याची शिक्षा, मार्सोलिसच्या बंदरावरील सावरकरांची उडी, त्यांचे क्रांतीकार्य हे इतकेच नसून त्यांच्या मराठी साहित्यातील त्यांचे उत्कट लेखन, संस्कृतचा प्रभाव असणाऱ्या कविता, कमला काव्य, आणखीही भरपूर …

Read More »

कुसमळीजवळील पर्यायी पूल वाहून गेला; बेळगाव-चोर्ला वाहतुकीस बंद 

  खानापूर : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन अखेर कुसमळी पुलाजवळ बांधलेला पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे बेळगाव-चोर्ला मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने परिसरात सर्वत्र पाण्याची भर पडली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत पर्यायी पुलावर पाणी नव्हते. मात्र, रविवारी सकाळी मलप्रभा …

Read More »

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघात, 7 जणांचा मृत्यू

  नवी दिल्ली : डेहराडूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी गौरीकुंडजवळ कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यात सहा जण होते. आम्ही या प्रकरणी अधिक माहितीची वाट पाहत आहोत,” असे उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले. त्यांनी …

Read More »

मलप्रभा नदी पुलावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघातात; एक ठार

खानापूर : बेळगाव-गोवा महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील साईड पट्टीवर दुचाकी धडकल्यामुळे डोकीला जबर मार बसल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील भातकांडे गल्ली नंदगड …

Read More »

२७ वर्षांची प्रतीक्षा संपली अन् दक्षिण आफ्रिका ठरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन!

  लॉर्ड्स : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये रंगला. पाच दिवसांचा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टेम्बा बावुमाच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. तब्बल २७ वर्षांनी त्यांनी दुसरी आयसीसी ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कमावली आहे. इंग्लंडमधील …

Read More »

सीमाभागातील मराठी पत्रकारांच्या हितासंदर्भात चर्चा!

  बेळगाव : आज शनिवार दि. १४ रोजी बेळगाव मिडिया असोसिएशनची बैठक श्री शंभू जत्तीमठ येथे घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत काकतीकर उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी संघटनेच्या सदस्या अरुणा गोजे- पाटील यांचे सासरे प्रभाकर नारायण गोजे -पाटील त्याचबरोबर अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्वांना स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळा क्र. 5 च्यावतीने जनजागृती फेरी

  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पर्यावरणाचे महत्व आणि मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासंदर्भात चव्हाट गल्लीत जागृती फेरी काढण्यात आली शाळेच्या आवारात जागृती फेरीचे उद्घाटन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी …

Read More »