बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने संकष्टी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पाचे पाद्य पुजन व पाठ पुजन मोठ्या भक्तीभावात संपन्न शनिवार दिनांक १४/६/२५ रोजी सायंकाळी ७ वाजता गल्लीतील जेष्ठ नागरिकांच्या वतीने पाद्य पुजन व पाठ पुजन करून महाआरती करण्यात आले. यावेळी सुहासिनी महिलांनी सजवुन आणलेली आरती करण्यात आले त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक रजत पाटील यांनी बोलताना यावर्षीच हे ५ वे वर्ष असुन मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा करूया असे सांगण्यात आले तसेच मंडळाचे अध्यक्ष बोलताना आमचं मंडळ कमी वेळातच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असुन ह्याच श्रेय मंडळाच्या कार्यकर्त्यांना जातंय अस म्हटलं व ह्यापुढीही असच कार्य आमच्या मंडळाकडून ह्यावे असे गणरायाकडे प्रार्थना केले तसेच अशोक खवरे यांनी बोलताना कमी वेळात प्रसिद्धी मिळवलेले हे मंडळ एकमेव असुन देखावा मध्ये सलग २ वेळा प्रथम पारितोषिक मिळवुन यंदा देखील आपण सामाजिक विषयावर देखावा सादर करणार आहोत असे सांगितले.
यावेळी महिला मंडळ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी युवक मोठ्या संख्येने विशेष परिश्रम घेतले होते. तसेच सूत्रसंचालन अरुण गावडे यांनी केले यावेळी सर्व महिला व कार्यकर्त्यांचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले.