Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावच्या शनी मंदिरात ‘शनी जयंती’चा उत्सव

  बेळगाव : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या आणि सुमारे २०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या बेळगावच्या श्री शनी मंदिरात आज श्री शनी जन्मोत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पाटील गल्लीतील या प्राचीन शनी मंदिरात वैशाख वद्य अमावस्येनिमित्त श्री शनी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली. सूर्यदेवाच्या जन्मावेळी, पहाटे श्री शनी महादेवाचा जन्मोत्सव पार …

Read More »

हिडकल जलाशयातून धारवाडला पाणीपुरवठा करण्याच्या कामासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवण्याची निविदा आमच्या लक्षात येण्यापूर्वीच निघाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, हा प्रकल्प स्थगित करण्याचे निर्देश दिले होते, परंतु संबंधित विभागांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला परवानगी दिली आहे आणि ते या विषयावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा …

Read More »

भाजप आमदार शिवराम हेब्बार, आमदार एस. टी. सोमशेखर यांची पक्षातून हकालपट्टी

  बेंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विजयपुरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हकालपट्टीनंतर भाजप हायकमांडने उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बर आणि बेंगळुरूचे यशवंतपूरचे आमदार एस.टी. सोमशेखर या दोघांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा आदेश जारी केला आहे. गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांनी भाजपने जारी केलेल्या व्हिपचे उल्लंघन करून काँग्रेसला …

Read More »

कर्नाटक मराठा समाजाचे नेते एम. जी. मुळे यांच्याशी होदेगिरी येथील छ. शहाजी महाराज समाधी विषयी चर्चा

  बेळगाव : आज मंगळवार दि. 27 मे 2024 रोजी बेळगाव किल्ला शासकीय विश्रांतीगृह येथे कर्नाटक मराठा समाजाचे प्रमुख नेते व विधान परिषदचे आमदार माननीय श्री. एम. जी. मुळे यांची सदिच्छा भेट घेऊन होदेगिरी येथील छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधी विषयी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी बेळगाव येथील प्रसिद्ध लेखक व …

Read More »

बेळगाव पुन्हा इनोव्हा गाडीचा थरार; अनेक गाड्यांना धडक…

  बेळगाव : सदाशिव नगर परिसरात सोमवारी मध्यरात्री उशिरा गोवा पासींग असलेल्या इनोव्हा गाडीने भीषण अपघात घडवला. यामध्ये एक मिनी गुड्स रिक्षा, ५ दुचाकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदाशिव नगरमधील अंकुश शॉपसमोर सोमवारी मध्यरात्री १२ …

Read More »

महापौर मंगेश पवार महसूल विभागाच्या कामकाजावर नाराज

  बेळगाव : महानगरपालिकेच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चुकीची माहिती देऊन महापालिकेची प्रतिमा खराब करू नये, तसेच त्यांच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढावा, असे निर्देश बेळगावचे महापौर मंगेश पवार यांनी दिले. आज बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागाची बैठक महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी …

Read More »

कारमध्ये बसून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

  पंचकूला : हरियाणाच्या पंचकूलामध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने कारमध्ये बसून विष प्राशन करुन आपले जीवन संपवले. पोलिसांनी सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आजोबा, आई-वडिल आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व सातही मृतदेहांच पोस्टमार्टम करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. …

Read More »

अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले; सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

  बीड : बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना …

Read More »

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलासह पाच जणांना ठोकल्या बेड्या

  पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांनी पलायन केले त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत केली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. …

Read More »

आता मालमत्ता नोंदणीसाठी ई-स्वाक्षरी अनिवार्य

  बंगळूर : आता यापुढे मालमत्ता नोंदणीसाठी ई-स्वाक्षरी अनिवार्य असेल. आजपासून, मालमत्ता किंवा इतर नोंदणी प्रक्रियेसाठी इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी अनिवार्य आहे. या संदर्भात, महसूल विभागाने कर्नाटक मुद्रांक सुधारणा कायदा लागू करणारा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, कोणत्याही नोंदणी प्रक्रिया डिजिटल केल्या जातील. या कायद्याने प्रक्रियेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विक्री करारांसह सर्व प्रकारच्या …

Read More »