Monday , September 21 2026
Breaking News

भाजप आमदार शिवराम हेब्बार, आमदार एस. टी. सोमशेखर यांची पक्षातून हकालपट्टी

Spread the love

 

बेंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विजयपुरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हकालपट्टीनंतर भाजप हायकमांडने उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बर आणि बेंगळुरूचे यशवंतपूरचे आमदार एस.टी. सोमशेखर या दोघांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा आदेश जारी केला आहे.

गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांनी भाजपने जारी केलेल्या व्हिपचे उल्लंघन करून काँग्रेसला मतदान केले. शिवाय, वारंवार पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याने त्यांना निलंबित करत 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्याचा आदेश जारी केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *