Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

एस.आर.एस. हिंदुस्थान अनगोळने पटकावला धर्मवीर चषक -2025

  बेळगाव : पिरनवाडी येथील सनसेट वॉरियर्स यांच्यातर्फे आयोजित धर्मवीर चषक -2025 भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद एस. डी. लायन्स पिरनवाडी संघाला पराभूत करत एस. आर. एस. हिंदुस्थान अनगोळ संघाने पटकावले. पिरनवाडी येथे सदर क्रिकेट स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेच्या मर्यादित 5 षटकांच्या अंतिम सामन्यात एस. डी. लायन्स …

Read More »

सात महिन्यापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह सापडला भूतनाथ डोंगरावर!

  खानापूर : गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता असलेले झाडअंकले येथील रहिवासी मारुती उसुरलकर (वय वर्षे 75) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत भूतनाथ येथील डोंगरावर सांगाड्याच्या स्वरूपात सापडला आहे. मृतदेहाची प्राथमिक ओळख त्यांच्या मृतदेह शेजारी असलेल्या चप्पल, छत्री व गळ्यातील वारकरी माळ यावरून पटविण्यात आली आहे. मात्र सरकारी नियमाप्रमाणे डीएनए परीक्षण …

Read More »

गाडीकोप खून प्रकरणाचा २४ तासात छडा : आरोपीला शिवमोग्गातून अटक

  खानापूर : बेळगावमधील खानापूर तालुक्यात दगडाने ठेचून करण्यात आलेल्या भीषण हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवमोग्गा मधून एका आरोपीला अटक केली आहे. बलोगा, तालुका खानापूर येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय ४७) या इसमाची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. सदर व्यक्तीचा मृतदेह खानापूर ते एम. के. हुबळी रस्त्यावरील गडीकोप गावानजीक असणाऱ्या …

Read More »

सीमाभागातील बहुआयामी व्यक्तीमत्त्व श्री. वाय. एन. मजुकर सर

  कर्तृत्वशाली नेतृत्वाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले येळ्ळूरचे सुपुत्र आणि सीमाभागातील सामाजिक, राजकीय, चळवळीतील बहुआयामी व्यक्तीमत्त्व लाभलेले श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक -अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुर सर यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त थोडक्यात….. बेळगावातील येळ्ळूर हे क्रांतिकारकांचे, शिक्षण-संस्थापकांचे, शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावी सरांचा जन्म एका गरीब …

Read More »

विद्युत तारेच्या स्पर्शाने इदलहोंड येथे 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

  खानापूर : विद्युत तारेच्या स्पर्शाने 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे घडली. बुधवारी (2 एप्रिल) सायंकाळी 5.45 वाजता ही दुर्घटना घडली. मनाली मारुती चोपडे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे. इदलहोंड आणि सिंगिनकोप या लागून असलेल्या गावांजवळ मारुती चोपडे यांचे घर आहे. त्यांच्या …

Read More »

खानापूर तालुक्यातील गाडीकोप येथे एकाचा दगडाने ठेचून खून

  खानापूर : खानापूर – एम. के. हुबळी मार्गावरील गाडीकोप रस्त्याला लागून असलेल्या शेतवडीत खानापूर तालुक्यातील बलोगा येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय 48) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना काल दिनांक 1 एप्रिल रोजी घडली आहे. मयत शिवनगौडा याचा भाऊ सन्नगौडा पाटील यांनी याबाबत खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दिली …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी विलास ना. घाडी

  बेळगाव : सोमवार दि. 31/03/2025 रोजी येळ्ळूर रोजी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक मावळते अध्यक्ष शांताराम कुगजी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कार्यालय श्री बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी समितीचे जेष्ठ नेते, आजी- माजी लोकप्रतिनिधी व युवा समितीनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समितीच्या नवीन कार्यकारणीची एकमताने …

Read More »

मुडा घोटाळा : उच्च न्यायालयाने ईडी चौकशीला दिली परवानगी

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुन्हा अडचणीत? बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मुडा जमीन वाटप प्रकरणात माजी आयुक्त डी. बी. नतेश वगळता सर्व आरोपींची चौकशी करण्याची परवानगी दिली. मुडाचे माजी आयुक्त डी. बी. नतेश यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी …

Read More »

6, 10, 14 एप्रिल रोजी बेळगावात कत्तलखाने, मांसाहार दुकाने बंद

  बेळगाव : एप्रिल-2025 मध्ये येणाऱ्या श्रीराम नवमी, महावीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेळगावातील कत्तलखाने व मांसाहारची दुकाने बंद ठेवण्याची सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिल्या आहेत. 6 एप्रिल रविवार श्रीराम नवमी, 10 एप्रिल शुक्रवार महावीर जयंती आणि 14 एप्रिल सोमवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील …

Read More »

एसएसएलसी परीक्षा केंद्राला जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची भेट

  बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा मंडळ संलग्न पदवीपूर्व विद्यालयातील एसएसएलसी परीक्षा केंद्राला जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी भेट दिली आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. परीक्षा केंद्रात बसवलेल्या सीसीटीव्ही प्रणालीसह अन्य सुरक्षाव्यवस्थांची तपासणी करण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या विज्ञान परीक्षेसाठी नोंदणीकृत 607 विद्यार्थ्यांपैकी 592 विद्यार्थी परीक्षेस हजर होते, …

Read More »