Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

वैजनाथ मंदिराचे पुजारी प्रमोद बर्वे यांची आत्महत्या

  बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील देवरवाडी (ता. चंदगड महाराष्ट्र) जवळील श्री वैजनाथ मंदिराचे पुजारी 32 वर्षीय प्रमोद प्रभाकर बर्वे (रा. देवरवाडी) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुजारी बर्वे यांनी गेल्या बुधवारी 18 मार्च रोजी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान …

Read More »

संविधान बदलण्याच्या वक्तव्यावरून भाजपची शिवकुमारांवर टीका

  वक्तव्याचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण; भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप बंगळूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी राज्यातील मुस्लिमांसाठी चार टक्के आरक्षणात सामावून घेण्यासाठी संविधानात बदल करणार असल्याचे वक्तव्य केल्याचा आरोप करून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परंतु आपण अशी कोणतीही टिप्पणी केली …

Read More »

कर्नाटक ‘हनी-ट्रॅप’ वाद : जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी

  प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी बंगळूर : कर्नाटक सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्यांना आणि न्यायाधीशांसह अनेकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याच्या कथित घटनेची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, याचिकाकर्ता बिनय कुमार सिंग यांच्या …

Read More »

प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या; प्रेमीयुगुल अटकेत

  कित्तूर : प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना कित्तूर येथील अंबडगट्टी गावात घडली असून प्रेमीयुगुलाला अटक करण्यात आली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, महाबळेश कामोजी आणि सिमरन या प्रेमीयुगुलांचे मागील ५ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. दोघांच्याही कुटुंबाला त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती नव्हती. सिमरन – महाबळेश …

Read More »

समिती युवा नेते शुभम शेळके यांना अटक..

  बेळगाव : कन्नडधार्जिण्या पीडीओला जाब विचारणाऱ्या किणयेतील (ता. बेळगाव) मराठी तरुणाचा सत्कार केला व सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या प्रकरणी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवुन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके …

Read More »

धर्मवीर संभाजीनगर वडगांव नागरिकांतर्फे महापौर मंगेश पवार यांचा सत्कार

  बेळगाव : धर्मवीर संभाजीनगर वडगांव येथील श्री गणेश मंदिर ट्रस्ट, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि महिला मंडळ यांच्यावतीने बेळगांवचे नवनिर्वाचित महापौर श्री. मंगेश नारायण पवार तसेच वार्ड क्र. 50 च्या नगरसेविका सौ. सारिका पाटील यांचा श्री गणेश मंदिराच्या सभागृहात रविवारी सायंकाळी जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. …

Read More »

महिला सक्षमीकरणाला सरकारचे प्रथम प्राधान्य : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : महिलांनी सक्षम होऊन देशाचे नेतृत्व केले पाहिजे. सिद्धरामय्या यांच्या सरकार पुढे स्त्री-पुरुष समान आहेत. विद्यमान सरकार बसवण्णा यांच्या तत्त्वानुसार चालत आहे. राज्यातील प्रत्येक अंगणवाडीला शासनाकडून उच्च दर्जा दिला जाईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज सोमवारी (२४ मार्च) येथील …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक

  मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचसोबत त्याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. …

Read More »

मंगळुरूमध्ये फसवणूक; बेळगावमधून दोन सायबर गुन्हेगारांना अटक

  बेळगाव : गरीब लोकांना लक्ष्य करून, त्यांच्याकडून बँक खाती उघडून आणि नंतर ब्लॅकमेल करून त्या खात्याद्वारे श्रीमंतांना पैसे ट्रान्सफर करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथे घडलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या पोलिसांना आरोपी बेळगावमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी तपास केल्यानंतर, बेळगावातून दोन सायबर …

Read More »

वडगाव येथील मराठी मुलींची शाळा नं. 5 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन व सदिच्छा समारंभ उत्साहात

  बेळगाव : सरकारी आदर्श मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. महादेव इब्रामपूरकर यांनी भूषविले. तर प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक श्री. नितीन बेनके यांनी केले. यावर्षीची आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. साक्षी चंदगडकर हिला प्रशस्तीपत्र …

Read More »