Sunday , July 26 2026
Breaking News

मंगळुरूमध्ये फसवणूक; बेळगावमधून दोन सायबर गुन्हेगारांना अटक

Spread the love

 

बेळगाव : गरीब लोकांना लक्ष्य करून, त्यांच्याकडून बँक खाती उघडून आणि नंतर ब्लॅकमेल करून त्या खात्याद्वारे श्रीमंतांना पैसे ट्रान्सफर करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथे घडलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या पोलिसांना आरोपी बेळगावमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी तपास केल्यानंतर, बेळगावातून दोन सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये बेळगाव येथील तहसीलदार गल्ली येथील अविनाश सुतार (२८) आणि रामदेव गल्ली येथील अनुप कारेकर (४२) यांचा समावेश आहे. त्यांचे काम गरीब आणि निष्पाप लोकांच्या छोट्या पैशांनी ऑनलाइन बँक खाती उघडणे आणि नंतर श्रीमंतांना त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी ब्लॅकमेल करणे होते. पोलिसांनी सध्या दोन आरोपींना अटक केली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *