Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत वडगाव येथील आई-मुलीचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : प्रयगराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत वडगाव भागातील आई आणि मुलीचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योती हत्तरवाड (50) आणि मेघा हत्तरवाड रा. वडगावी अशी मृतांची नावे आहेत. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर दोघीनांही प्रयागराज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने दोघींचाही मृत्यू झाला. आज …

Read More »

कुंभमेळ्याला गेलेले बेळगावचे 5 भाविक बेपत्ता? : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

  बेळगाव :  उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला गेलेले बेळगावचे पाच भाविक बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बेळगावातील 30 जण कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्यापैकी पाच जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आज मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात 10 कोटींहून अधिक भाविक शाही स्नानासाठी येणार आहेत. बेळगावातून 30 जण …

Read More »

महाकुंभमेळ्यात गेलेल्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यासह दोन मुली जखमी

  बेळगाव : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावमधील काही नागरिक जखमी झाले आहेत. कुंभमेळ्यासाठी गेलेल्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्या तसेच दोन मुली जखमी झाल्या असल्याचे वृत्त हाती आले आहे. जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे सरोजिनी नंदूविनळ्ळी (रा. कुपेम्पू नगर) आणि कांचन कोपर्डे (रा. शेट्टी गल्ली) कांचन कोपर्डे यांच्यासमवेत त्यांचे …

Read More »

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत बेळगावच्या भाविकांचा समावेश?

  बेळगाव : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये आज (बुधवार) मौनी अमावस्येच्या पवित्र स्थानानिमित्त संगमावर प्रचंड गर्दी झाल्याने झालेल्‍या चेंगराचेंगरीत 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर शंभरहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बेळगावच्या ही चार भाविकांचा समावेश असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेळगावचे 9 भक्त एकत्र …

Read More »

लेझिम, ढोल ताशांचा गजर, मराठमोळ्या पेहरावात विद्याप्रसारक मंडळाची शोभायात्रा उत्साहात

  बेळगाव : लेझिम आणि ढोल ताशांचा गजर, मराठमोळ्या पेहरावात सहभागी झालेले विद्यार्थी आणि पालक, छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड जयघोष अशा उत्साही गजाननराव भातकांडे शाळेतर्फे काढण्यात आलेली शोभायात्रा शहरवासीयांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. तसेच शोभा यात्रेनंतर प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सूमधुर गायनालाही मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक जण त्यांच्या …

Read More »

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू, अनेक भाविक जखमी; शाही स्नान रद्द

  प्रयगराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. मात्र याच कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत तर 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे. प्रयागराजमधील …

Read More »

गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी

  खानापूर : दिनांक 19 जानेवारी रोजी चन्नेवाडी ता.खानापूर येथे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला एक महिला उपस्थित होती. अंत्यविधी आटोपून आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना झुंजवाड या ठिकाणी महिलेच्या पतीला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून ही महिला पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला. तेथून तिला नंदगड तसेच बेळगाव येथील खासगी …

Read More »

बेळगाव परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : बेळगाव परिसरातील विविध संघ-संस्थांमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येळ्ळूर ग्राम पंचायतीचा 76 वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण; स्वच्छता अभियान निष्ठावंत कर्मचाऱ्याकडून बेळगाव : रविवार दिनांक 26/01/2025 रोजी येळ्ळूर ग्रामपंचायतमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ग्राम पंचायत अध्यक्षा श्रीमती लक्ष्मी मासेकर व उपाध्यक्ष श्रीमान …

Read More »

येळ्ळूर महाराष्ट्र राज्य फलक खटल्यातील सर्व संशयित निर्दोष

  बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर झालेल्या दगडफेक आणि लाठीमार प्रकरणी दाखल साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असून या खटल्यातील सर्व 26 संशयीतांची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने आज सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य नामफलका वरून झालेल्या दंगली …

Read More »

निपाणीतील युवती घेणार संन्यास

  प्रकाश शाह; ५० वर्षानंतर पहिली घटना निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील डॉ. वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची कन्या ऋतिकाबेन मेहता (वय २३) यांनी जैन धर्माची दीक्षा घेऊन संन्याशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रविवारी (२५ मे ) त्यांचा दीक्षाविधी …

Read More »