Sunday , September 20 2026
Breaking News

गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी

Spread the love

 

खानापूर : दिनांक 19 जानेवारी रोजी चन्नेवाडी ता.खानापूर येथे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला एक महिला उपस्थित होती. अंत्यविधी आटोपून आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना झुंजवाड या ठिकाणी महिलेच्या पतीला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून ही महिला पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला. तेथून तिला नंदगड तसेच बेळगाव येथील खासगी इस्पितळात नेण्यात आले, त्यानंतर तिला हुबळी येथील किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले पण उपचाराचा उपयोग न होता या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा नाव सावित्री प्रभाकर पाटील असे असून ती अळणावर तालुक्यातील कडबगट्टी या गावची आहे. हा गतिरोधक तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असून त्या ठिकाणी कुठलाही सूचना फलक लावलेला नाही किंवा त्या गतिरोधकावरती पांढऱ्या रंगाचे पट्टेही मारलेले नाहीत. या अपघाताला जवाबदार कोण असा सवाल नागरिकांतून होत आहे, यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे,

सावित्री यांच्या पश्चात सासू, पती, चिरंजीव, कन्या, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *