Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीतील युवती घेणार संन्यास

Spread the love

 

प्रकाश शाह; ५० वर्षानंतर पहिली घटना

निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील डॉ. वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची कन्या ऋतिकाबेन मेहता (वय २३) यांनी जैन धर्माची दीक्षा घेऊन संन्याशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रविवारी (२५ मे ) त्यांचा दीक्षाविधी कार्यक्रम गुजरातमधील संखेश्वरपुरम तीर्थ येथे होणार आहे. ऋतिकाबेन यांचे गुरुवारी (ता.३०) निपाणीत आगमन होत असून त्यांचे महावीर आरोग्य सेवा संघा तर्फे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश शाह यांनी दिली. सेवार्थ दवाखान्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
प्रतिक शहा यांनी स्वागत केले. प्रकाश शाह म्हणाले, गेल्या ५० वर्षात प्रथमच येथील जैनधर्मिय व्यक्ती संन्याशी म्हणून दीक्षा धारण करत आहे. ऋतिकाबेन यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीड वर्षे वकिली केली. याचदरम्यान धर्माबद्दलची आस्था वाढत गेल्याने त्यांनी धार्मिक ग्रंथ, जैन धर्माची तत्त्वे जाणून घेतली. यावेळी धर्माबद्दलचे प्रेम अधिकच वाढत गेल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. यासाठी जप, तप, उपवास, ग्रंथ वाचन, तत्वे अंगिकारली आहेत. २५ मे ला गुजरात येथील संखेश्वरपुरम तीर्थ पालीताना येथे दीक्षाविधीचा कार्यक्रम होणार आहे.
चार दिवसांपूर्वी त्यांनी जाऊन दीक्षा विधीचा मुहूर्त घेतला. हा मुहूर्त घेऊन त्यांचे गुरुवारी आगमन होणार आहे. सकाळी ८.१५ वाजता त्यांचे रोटरी क्लबजवळ आगमन होणार आहे .येथून दुचाकी रॅलीने दोशी य वखारीपर्यंत आणल्यानंतर तेथून स्वागत मिरवणूक पार पडणार आहे. अशोक नगर, कित्तूर चन्नम्मा चौक, कोठीवाले कॉर्नरमार्गे मिरवणूक चंद्रप्रभ बावन जिनालय येथे आल्यानंतर सभागृहात प्रेरणा उत्सव, मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. यानंतर प्रसाद वाटप होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन शाह यांनी केले.
यावेळी उपाध्यक्ष सतीश वखारीया, सचिव मिलिंद मेहता, राजेश शहा, सुरज राठोड, महिपाल शहा, राजू मेहता, जवाहर शहा, बसवराज जडी, वैभव कंगळे, राहुल कोठारी, संदीप माने, रितेश शहा, सुजित स्वामी, सुजल मेहता यांच्यासह डॉ. वैशाली व विलास पारिख महावीर आरोग्य सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *