Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

जायंट्स मेनचे सदस्य कच्छ (गुजरात)ला रवाना

  जायंट्स आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार सहभागी बेळगाव : मुंबईचे नगरपाल कै. नाना चुडासमा यांनी सुरू केलेल्या जायंट्स इंटरनॅशनल या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले. बघता बघता देशभरात शाखा सुरू केल्यानंतर देशाबाहेरसुद्धा जायंट्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून सहासेपेक्षा जास्त शाखेतूनजनतेची सेवा करण्याचे कार्य सुरू आहे. कै. नानांच्या पश्चात त्यांच्या कन्या आणि भाजपाच्या …

Read More »

तालुकास्तरीय दुर्गबांधणी स्पर्धेत अक्कोळ शिवशंभु ग्रुप प्रथम

  श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आयोजन; भारती झालेल्या जवानांचाही सत्कार निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या येथील शाखेतर्फे आयोजित तालुकास्तरीय दुर्गबांधणी स्पर्धेत अक्कोळ येथील धर्मवीर संभाजी नगरातील शिवशंभू ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. गळतगा येथील सार्थक संजय जाधव गळतगा आणि अक्कोळ येथील श्रावणी संदीप सदावर्ते यांनी विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. अक्कोळ छत्रपती …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतच्या भ्रष्टाचारासंबंधी जिल्हा पंचायत सीईओंची घेतली भेट!

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये 2018-19 या आर्थिक वर्षात 14 वा वित्त आयोग योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत पंचायत राज खाते व कर्नाटक लोकायुक्ताकडे तक्रार देण्यात आली होती. अद्याप कोणतीही कारवाही झाली नाही. यासाठी पुन्हा एकदा येळ्ळूर ग्राम पंचायतच्या भ्रष्टाचाराबद्दल जिल्हा …

Read More »

हुळंद-कणकुंबी रस्त्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील अतिघनदाट अरण्य प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी भागातील कणकुंबी नजीक, हुळंद-कणकुंबी रस्त्यावरुन दुचाकी प्रवास करणाऱ्या नागरिकांना भर दिवसा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. परंतु नागरिकांनी न घाबरता आपल्या दुचाकी थांबवून सदर पट्टेरी वाघाची छबी व व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये टिपला आहे. त्यासाठी या भागातील नागरिकांनी सावधानता …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी अनंत लाड यांची निवड तर उपाध्यक्षपदी डॉ. विनोद गायकवाड

  बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री. अनंत चांगाप्पा लाड यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाहपदी सौ. सुनीता मोहिते व सहकार्यवाहपदी श्री. अनंत जांगळे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष माजी महापौर गोविंदराव राऊत यांच्या …

Read More »

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल

  नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली आहे. देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार …

Read More »

“जय महाराष्ट्रा”च्या घोषणा दिल्यामुळे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गुन्हा नोंदवा..

  बेळगाव : अनगोळ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीच्या अनावरणप्रसंगी महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “जय महाराष्ट्र” अशा घोषणा दिल्या जात असताना बेळगाव दक्षिणचे आमदार व महापौरांनी निषेध करण्याऐवजी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कित्तूर कर्नाटक सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलणाऱ्या कन्नड समर्थक …

Read More »

तिबेटला भूकंपाचा तडाखा; 53 जणांचा मृत्यू

  तिबेट : नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका तासाच्या आत सलग सहा भूकंप झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 मोजली गेली. या भूकंपाचे धक्के भारत आणि बांगलादेशच्या अनेक भागात जाणवले. परंतु भूंकपाचा केंद्रबिंदू तिबेट होता. या भूकंपात किमान 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. 38 …

Read More »

दोडहोसुर नजीक दुचाकीची झाडाला धडक; एक जागीच

  खानापूर : दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी आढळल्याने झालेल्या भीषण अपघातात रायबाग तालुक्यातील एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी खानापूर – पारीश्वाड मार्गावर, दोडहोसुर व यडोगा क्रॉस नजीक घडली आहे. सावंत निंगाप्पा शॅंडगे (वय …

Read More »

शासन आणि समाजानेही पत्रकारांच्या समस्यांचा गंभीरपणे विचार करावा : डॉ. गणपत पाटील यांचे प्रतिपादन

  बेळगाव : विविध प्रश्नांवर लेखणीद्वारे आवाज उठवणे, सामाजिक कार्याला योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. असल्याचे प्रतिपादन सिनेनिर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ. गणपत पाटील यांनी बोलताना केले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो. बेळगावातही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून …

Read More »