Sunday , July 26 2026
Breaking News

“जय महाराष्ट्रा”च्या घोषणा दिल्यामुळे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गुन्हा नोंदवा..

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीच्या अनावरणप्रसंगी महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “जय महाराष्ट्र” अशा घोषणा दिल्या जात असताना बेळगाव दक्षिणचे आमदार व महापौरांनी निषेध करण्याऐवजी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कित्तूर कर्नाटक सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलणाऱ्या कन्नड समर्थक कस्तुरी भावी यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मुर्तीच्या अनावरणाप्रसंगी महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “जय महाराष्ट्रा”चा जयघोष केला. यासाठी मंत्र्यांवर राज्यद्रोहचा गुन्हा नोंदवावा. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी जय महाराष्ट्र म्हटल्यावर आमदार अभय पाटील आणि बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर सविता कांबळे यांनी टाळ्या वाजवून कर्नाटकच्या जनतेचा अपमान केला म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करून राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.

यावेळी देवेंद्र कांबळे, वासू बसनायकर, संतोष तल्लीमणी, शशिकांत अष्टेकर, भरमा कांबळे, नागेश थिंबुली, अनिल दड्डीमनी, भागण्णा कुरुबर आदींचा सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *