Monday , April 20 2026
Breaking News

जायंट्स मेनचे सदस्य कच्छ (गुजरात)ला रवाना

Spread the love

 

जायंट्स आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार सहभागी

बेळगाव : मुंबईचे नगरपाल कै. नाना चुडासमा यांनी सुरू केलेल्या जायंट्स इंटरनॅशनल या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले. बघता बघता देशभरात शाखा सुरू केल्यानंतर देशाबाहेरसुद्धा जायंट्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून सहासेपेक्षा जास्त शाखेतूनजनतेची सेवा करण्याचे कार्य सुरू आहे.
कै. नानांच्या पश्चात त्यांच्या कन्या आणि भाजपाच्या नेत्या शायना एनसी या अध्यक्षा आहेत.
दरवर्षी वेगवेगळ्या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कच्छ गुजरात येथे दि. ०९ जानेवारी ते ११ जानेवारीपर्यंत येथे ही परिषद आयोजित केली असून यामध्ये तीन हजारहुन अधिक सदस्य सहभागी होत असतात.
बेळगावमधून सुद्धा जायंट्स मेनचे सदस्य प्रत्येक वर्षी भाग घेत असतात.
यावर्षी विशेष समिती सदस्य मोहन कारेकर यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशन संचालक शिवराज पाटील, माजी अध्यक्ष उमेश पाटील, अशोक हलगेकर, सुनिल भोसले, उपाध्यक्ष विजय बनसुर, अरविंद देशपांडे, मुकुंद महागावकर, विनोद आंबेवाडीकर, विजय पाटील, जयवंत पाटील, अनंत कुचेकर व आनंद कुलकर्णी आज रेल्वेने रवाना झाले.
मदन बामणे, विश्वास पवार, आनंद आपटेकर, आदित्य पाटील, अश्विनी हंगीरगेकर व प्रणाली पाटील यांनी रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love  ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात आजपासून बेळगाव होणार शिवमय; शिवज्योतीच्या आगमनाने उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *