Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 : राजा शिवाजी बेळगाव संघाचा दणक्यात विजय

  बेळगाव : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आज “राजा शिवाजी बेळगाव” संघाने धारवाड संघाचा धुव्वा उडविला. धारवाड संघाने प्रथम फलंदाजी करत ९ षटकात ८० धावांचे आव्हान दिले होते. परंतु राजा शिवाजी बेळगाव संघाने ५.४ षटकातच ८३ धावा ठोकत विजय साकार केला. उद्या संध्याकाळी ६ वाजता राजा …

Read More »

कर्नाटक अधिवेशनाला प्रत्युत्तर महामेळाव्यानेच; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार

  बेळगाव : कर्नाटक सरकारने येत्या 8 डिसेंबर रोजी बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक आज ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. माजी आमदार मनोहर किणेकर हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीत अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. …

Read More »

कर्नाटका सॉफ्टबॉल प्रीमिअम लीग 2025 : डॉ. अंजलीताई फाउंडेशन पुरस्कृत “राजा शिवाजी बेळगाव” टीम बेंगलोर मध्ये दाखल …

  खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल प्रिमीअम लीग ही राज्यस्तरावर खेळविली जाणारी स्पर्धा असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याला एक टीम आहे. बेळगाव जिल्ह्याच्या टीमचे नाव “राजा शिवाजी बेळगाव” असे असून ही टीम काल रात्री बेंगलोर येथे दाखल झाली आहे. टीमचे प्रायोजक डॉ. अंजलीताई फाउंडेशन खानापूर करत असून यावेळी ही टीम फायनल …

Read More »

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या ज्योती सेंट्रल स्कूलला आंतरशालेय स्पर्धेत प्रथम स्थान!

  बेळगाव : के. एल. ई. सोसायटीचे राजा लखमगौडा प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स, (आर.एल.एस), कॉलेज रोड, बेळगाव येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या “साइंटिया वेनारी – ६.०” या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनी आणि टॅलेंट हंटमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगावने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या आंतरशालेय स्पर्धेत …

Read More »

पैशाच्या देवाणघेवाणीतून शहापूर येथे तरुणावर प्राणघातक हल्ला

  बेळगाव : शहापूर होसुर मठ गल्ली परिसरात पाच हजार रुपयांच्या देवाणघेवाणीतून प्रसाद चंद्रकांत जाधव नामक तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना रात्री 8 च्या सुमारास घडली असून हल्लेखोर तरूणाला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद जाधव याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार …

Read More »

के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे आयोजन

  बेळगाव : येथील के.एल.ई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये कन्नड, हिंदी आणि इंग्रेजी भाषा विभागाच्या वतीने राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे दि. 10 आणि 11 नोव्हेंबरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य महोत्सवाचा प्रमुख विषय भविष्याची प्रतिध्वनि: कृत्रिम बुद्धिमत्त्ता (एआय) आणि साहित्य असा आहे. या साहित्य महोत्सवाला उद्घाटक म्हणून कर्नाटक राज्याचे माजी विधान …

Read More »

भक्त कनकदास जयंतीनिमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा

  बेळगाव : बेळगाव शहरात आज भक्त कनकदास जयंतीचा उत्साह संचारला असून, यानिमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आज बेळगावात भक्त कनकदास जयंतीचा उत्साहपूर्ण माहोल होता. शहरातील बुडा कार्यालयाजवळील श्री भक्त कनकदास चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषद मुख्य …

Read More »

ज्येष्ठ ख्रिस्ती धर्मगुरू फादर कुस्तास लिमा यांचे निधन

  बेळगाव : गोवा धर्मप्रांताच्या सेवेत असलेले व मूळ संगरगाळी, ता. खानापूर येथील फादर कुस्तास लिमा, एस.जे. यांचे शुक्रवारी दुपारी गडहिंग्लज येथे निधन झाले. निधन समई फादर लिमा हे गडहिंग्लज येथील संत आंतोनी चर्च येथे धर्मगुरु म्हणून सेवेत होते. गडहिंग्लज येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. फादर लिमा हे एक …

Read More »

एडीजीपी हितेंद्र आर यांनी केली जखमी पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस

  बेळगाव : कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी हितेंद्र आर यांनी शुक्रवारी हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोलजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेत जखमी झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमी पोलिसांवर बेळगाव शहरातील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी रुग्णालयात पोहोचलेल्या एडीजीपींनी जखमींना धीर …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये कनकदास जयंती साजरी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये कनकदास जयंती दिनांक 8 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. कनकदास जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्या कन्नड विषय शिक्षिका शबाना मुजावर उपस्थित होत्या. यांनी संत कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर कनकदास यांचा जीवनप्रवास, तत्त्वज्ञान, संस्कृती आणि कलेला दिलेला आधार शबाना मुजावर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. …

Read More »