Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये कनकदास जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये कनकदास जयंती दिनांक 8 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. कनकदास जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्या कन्नड विषय शिक्षिका शबाना मुजावर उपस्थित होत्या. यांनी संत कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर कनकदास यांचा जीवनप्रवास, तत्त्वज्ञान, संस्कृती आणि कलेला दिलेला आधार शबाना मुजावर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका सविता गुरव यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *