Sunday , July 26 2026
Breaking News

चलवेनहट्टी येथे नुतन शाळा सुधारणा समितीची रचना

Spread the love

 

बेळगाव : चलवेनहट्टी प्राथमिक मराठी शाळेच्या नुतन शाळा सुधारणा समितची रचना नुकताच करण्यात आली. शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी मनोहर हुंदरे यांची फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नंदिनी कलखांबकर यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनवर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया करण्यात आली. पालक म्हणून महीला आपल्या पाल्याकडे अधिक लक्ष देत असतात त्यामुळे शाळेच्या विकासासाठी अधिक वाव मिळण्यास मदत होत असल्याने शाळा सुधारणा समितीमध्ये महिलांची सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय उपस्थिताच्या वतीने घेण्यात आला व तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अत्यंत खेळीमेळीत निवड झालेल्या शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नंदिनी कलखांबकर, सदस्य नामदेव पाटील, विठ्ठल कलखांबकर, बाबू सनदी, सतिश होसूरकर, हाल्लाप्पा आलगोंडी, कविता हुंदरे, लक्ष्मी पाटील, रेणुका आलगोंडी, नंदा पाटील, जयश्री पाटील, दिपा हुंदरे, सरीता पाटील, लक्ष्मी बडवाणाचे, मनाली हुंदरे, मंगल पाटील, रेणुका तानाजी आलगोंडी, अशी नुतन शाळा सुधारणा समितीची नेमणूक केली.

यावेळी पी.डी.ओ सुनिता पाटील, मुख्याध्यापक एम.सी. वाणुळकर ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील शिक्षण प्रेमी भरमा आलगोंडी, लक्ष्मण बडवाणाचे, सह पालक वर्ग तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *