Monday , September 21 2026
Breaking News

के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : येथील के.एल.ई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये कन्नड, हिंदी आणि इंग्रेजी भाषा विभागाच्या वतीने राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे दि. 10 आणि 11 नोव्हेंबरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य महोत्सवाचा प्रमुख विषय भविष्याची प्रतिध्वनि: कृत्रिम बुद्धिमत्त्ता (एआय) आणि साहित्य असा आहे. या साहित्य महोत्सवाला उद्घाटक म्हणून कर्नाटक राज्याचे माजी विधान परिषद सदस्य आणि कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. महांतेश कवटगीमठ उपस्थित असतील.
या साहित्य महोत्सवाला संसाधन व्यक्ति म्हणून बेंगलरु येथील ख्राईस्ट विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाचे डॉ. सी. बालकृष्णन, कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रो. अर्जुन चव्हाण आणि विजयवाणी कन्नड वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार श्री. महेश विजापुरे मार्गदर्शकच्या रुपात उपस्थित राहतील. या साहित्य महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी कविता स्पर्धा, चित्रकला, एकपात्री अभिनय, पथ नाट्य, नृत्य, वाद्य संगीत स्पर्ध, फॅशन शो, कवितेवर आधारित चित्र बनवणे, पोस्टर बनवणे, फोटोग्राफी, रिल बनवणे अशा विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे आणि साहित्य महोत्सव यशस्वी करावा. असे आवाहन लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एस. मेलीनमनी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *