Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली

  कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक आठवडे वयाची १८ गायींची वासरे व त्याच वयाची म्हशींची ३४ रेडके बेकायदेशीररीत्या टेम्पो गोठ्यात ठेवली आहेत, अशी माहिती गोरक्षण सेवा समिती निपाणीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मिळाली. यावेळी सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने या वासरांची …

Read More »

चंदगडमध्ये गोवा बनावटीची तब्बल सात लाखाची दारु जप्त

  चंदगड : ऐन निवडणुकीत चंदगड (कोल्हापुरात) दारुचा महापूर आला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने 7 लाख 40 हजार 880 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अवैध दारुची विक्री व वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाई करणेसाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. अवैध …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्याचा शिरोडा येथे समुद्रात बुडून मृत्यू

  बेळगाव : शिरोडा वेंगुर्ला तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा वेळागर येथील समुद्रात रविवारी सकाळी आंघोळीसाठी उतरलेल्या बेळगाव येथील श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्याचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. विनायक ऊर्फ पप्पू शिंदे (वय 44, रा. गोंधळी गल्ली, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी सिंधुदुर्गात …

Read More »

बिबट्याच्या हल्ल्यात बकरी, कुत्री भक्षस्थानी!

  खानापूर : पंधरा दिवसांपूर्वी चापगाव हडलगा रस्त्यावर सदर बिबट्या दिसून आला होता. सदर बिबट्याच्या भक्ष्यस्थानी कुत्री व बकरी पडत आहेत. काही लोकांची बकरी नाहीशी झाल्याचे निदर्शनाला आले. मात्र प्रत्यक्षात खैरवाड डोंगरी जवळ हडलगा येथील एका शेतकऱ्याचा एक चांगला ठगर व बकरी ठार झाल्याची बाब निदर्शनाला आली. काही बकरी जखमी …

Read More »

काळादिन सायकल फेरी : समिती नेत्यांसह पत्रकारावरही गुन्हा दाखल

  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिनी मूक सायकल फेरीत सहभागी झालेल्या एकीकरण समिती नेत्यांसह कार्यकर्त्यांवर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी कर्नाटक सरकारने मराठी भाषिक वकील आणि पत्रकारांवर देखील गुन्हे नोंदविले आहेत. ऍड. महेश बिर्जे, ऍड. अमर येळ्ळूरकर, ऍड. सुधीर चव्हाण या वकिलांसह सुहास …

Read More »

किमती ऐवजाची बॅग प्रवाशाला परत; रिक्षा चालकाचा सत्कार

  बेळगांव : दिवाळीसाठी बेळगावात आलेल्या परगावच्या नागरिकाची किमती ऐवजाची बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल रिक्षा चालकाचा सत्कार करण्यात आला. राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अब्दुल मिस्त्री दुबईवाले तसेच रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने ही बॅग परत मिळाली त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. बेळगावात आलेले महेश जगजंपी यांना त्यांची बॅग रिक्षामध्ये …

Read More »

माध्यमांमधील आक्षेपार्ह बातम्यांवर लक्ष ठेवा : निवडणुक निरीक्षक (पोलीस) अर्णब घोष

  • माध्यम व तक्रार निवारण कक्षाला दिली भेट कोल्हापूर (जिमाका): विधानसभा निवडणूक कालावधीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावर प्रसिध्द होणाऱ्या आक्षेपार्ह बातम्या व मजकूरावर लक्ष ठेवा, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्यासाठी नियुक्त निवडणुक निरीक्षक (पोलीस) अर्णब घोष यांनी दिल्या. श्री. घोष यांनी आज माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती, मीडिया कक्ष, …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

  जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर सुरक्षा दलाचे चार जवान घायाळ झाले आहेत. काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील खानयारमध्ये आज शनिवारी सकाळपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत एका सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या भागात …

Read More »

बिदर येथे काळादिन गांभीर्याने पाळून, निषेध फेरी

  बिदर : सीमाभागात 1 नोव्हेंबर हा काळा दिन व सुतक दिवस म्हणून पाळण्यात येतो. बोन्थी तालुका औराद बिदर येथे समितीचे अध्यक्ष रामराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली काळा दिन गांभीर्याने पाळण्यात आला आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवला. यावेळी बोलताना रामराम राठोड म्हणाले की, गेली 69 वर्ष सीमाभागातील मराठी …

Read More »

अरगन तलावात आढळला आई-मुलाचा मृतदेह!

  बेळगाव :  हिंडलगा रोडवरील गणपती मंदिर परिसरातील अरगन तलावात आज शनिवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. तलावात स्वतःला झोकून देऊन आई आणि मुलाने आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार कॅम्प येथील विनायक मंदिरा शेजारील अरगन तलावात दोन मृतदेह तरंगत असल्याचे मिलिटरी प्रशासनाना लक्षात आले. लागलीच याची …

Read More »