Sunday , September 20 2026
Breaking News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्याचा शिरोडा येथे समुद्रात बुडून मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : शिरोडा वेंगुर्ला तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा वेळागर येथील समुद्रात रविवारी सकाळी आंघोळीसाठी उतरलेल्या बेळगाव येथील श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्याचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. विनायक ऊर्फ पप्पू शिंदे (वय 44, रा. गोंधळी गल्ली, बेळगाव) असे त्याचे नाव आहे.

दिवाळीची सुट्टी असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी
सिंधुदुर्गात गेले होते. हे सर्व सकाळी शिरोडा वेळागर येथील
बीचवर पोहोचले. यातील विनायक शिंदे यांचा किनाऱ्यापासून
काही अंतरावरच समुद्रात अंघोळीवेळी पाण्यात बुडून मृत्यू झाला.
पप्पू हा श्रीराम सेना हिंदूस्थानचा धडाडीचा कार्यकर्ता तसेच
समाजसेवक होता.

श्रीराम सेना हिंदूस्थानच्या माध्यमातून कोरोना महामारीत काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी दिलेलं योगदान
अमूल्य आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *