Wednesday , December 4 2024
Breaking News

अरगन तलावात आढळला आई-मुलाचा मृतदेह!

Spread the love

 

बेळगाव :  हिंडलगा रोडवरील गणपती मंदिर परिसरातील अरगन तलावात आज शनिवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. तलावात स्वतःला झोकून देऊन आई आणि मुलाने आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले.

याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार कॅम्प येथील विनायक मंदिरा शेजारील अरगन तलावात दोन मृतदेह तरंगत असल्याचे मिलिटरी प्रशासनाना लक्षात आले. लागलीच याची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एच इ आर एफ आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल संघटनेचे बसवराज हिरेमठ, संतोष दरेकर अवधूत तुडवेकर आदींनी प्रयत्न करून पाण्यावर तरंगत असलेल्या मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

त्यावेळी मृतदेह सोबत मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केल्याने आणि सासू-सासर्‍यांनी त्रास दिल्याने मुलगा आणि आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. आत्महत्या केलेल्या आईचे नाव कविता बसवंत जुनेबेळगावकर (40) आणि मुलगा समर्थ बसवंत जुनेबेळगावकर (14) रा. कलखांब असे आहे.

सदर घटनेची कॅम्प पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

Spread the love  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *