Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

खानापूरात लॉजवर पोलिसांचा छापा : वेश्याव्यवसायात गुंतलेल्या 16 जणांना अटक

  खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँकेसमोरील निमंत्रण लॉजवर छापा टाकून या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या 16 आरोपींना अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी लॉजच्या  वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या 11 ग्राहकांना अटक केली आहे. पाच महिलांची …

Read More »

नवीन जलाशयाच्या बांधकामाला बसुर्ते ग्रामस्थांचा विरोध; बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावात नवीन जलाशयाच्या बांधकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 9 गावांना सतत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारने 250 एकर जागेवर नवीन जलाशय बांधण्याचा घाट घातल्याचा निषेध बेळगाव तालुक्यातील बसुर्ते ग्रामस्थांनी केला. कोणत्याही कारणास्तव आपली जमीन देणार नसल्याचा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसुर्ते गावातील शेतकरी …

Read More »

निवडणूक जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाचा उल्लेख करावा : मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नासंबंधी आपापल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी अशा प्रकारची पत्रे पाठविण्यात आली आहेत. या संदर्भात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने इस्लामपूर येथे माजी कृषिमंत्री …

Read More »

सीमालढा आणि मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी पत्रकारांचे योगदान मोलाचे : मालोजी अष्टेकर

  युवा समितीच्यावतीने मराठी पत्रकारांचा सन्मान बेळगाव : गेली ६७ वर्ष सुरू असलेल्या सीमालढ्यात तसेच माय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बेळगाव सीमा भागातील मराठी पत्रकारांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, …

Read More »

आयआयएचएम संस्थेतर्फे शिक्षकांचा गौरव

  बेळगाव : गोवा येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीने बेळगावातील शैक्षणिक समूह संस्था प्रमुखांचा तसेच शिक्षकांचा गौरव समारंभ मंगळवारी पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख तसेच सहाय्यक शिक्षक यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

वडिलांचा संशयास्पद मृत्यू; मुलीने केली पोलिसात तक्रार

  बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पद्मन्नावर यांच्या मृत्यू प्रकरणी पत्नी उमा यांच्यावर संशय असल्याचा गंभीर आरोप संतोष यांच्या मुलीने केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष पद्मन्नावर हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत महांतेशनगर, अंजनेयनगर परिसरात राहात होते. त्यांना पत्नी व तीन मुले असून मोठी मुलगी …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत “वुमन ऑफ इम्पॅक्ट” पुरस्काराने सन्मानित

  बेळगाव : प्रसिद्ध डॉक्टर, समर्पित समाजसेविका आणि कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चाच्या सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत यांना “वुमन ऑफ इम्पॅक्ट” हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांना समाजसेवा श्रेणीतील सन्मानासाठी निवडण्यात आले. मंगळवार दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील राष्ट्रीय शेअर बाजारात सदर पुरस्कार …

Read More »

निपाणी उरुसानिमित्त दर्गाहमध्ये नैवेद्य दाखविण्यासह दर्शनासाठी भाविकांची गर्दी

  निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला दोन दिवसापासून प्रारंभ झाला आहे. सोमवारी (ता.१४) संदल बेडीचा उरुस पार पडला. मंगळवारी (ता.१५) भर उरूस झाला. त्यानिमित्त नैवेद्य अर्पण करण्यासह दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. फकीर आणि मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्गाह …

Read More »

निपाणी उरूसातील शर्यतीत आडीच्या हरेर यांची बैलगाडी प्रथम

  निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसानिमित्त येथील आंबेडकर नगरात मंगळवारी (ता.१५) घोडागाडी आणि बैलगाडी शर्यती पार पडल्या. त्यामध्ये बैलगाडी शर्यतीत आडी येथील पल्लू हरेर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १०००१ रुपयांचे बक्षीस व निशान मिळवले. या शर्यतीत स्वप्निल चौगुले (चिखलव्हाळ) …

Read More »

येळ्ळूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेकडून शिवस्मारकाचा अहवाल ग्रामस्थांसमोर सादर

  येळ्ळूर : येळ्ळूरमध्ये हिंदवी स्वराज युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून 25 फेब्रुवारी 2024 रोजी शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्री संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते अश्वारूढ शिवमूर्तीचे लोकार्पण झाले होते. त्या खर्चाचा लेखाजोखा हिंदवी स्वराज युवा संघटनेकडून येळ्ळूर ग्रामस्थांसमोर विजयादशमीच्या निमित्ताने ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीच्या प्रांगणात सादर करण्यात आला. या …

Read More »