Monday , March 24 2025
Breaking News

खानापूरात लॉजवर पोलिसांचा छापा : वेश्याव्यवसायात गुंतलेल्या 16 जणांना अटक

Spread the love

 

खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँकेसमोरील निमंत्रण लॉजवर छापा टाकून या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या 16 आरोपींना अटक केली.
गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी लॉजच्या  वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या 11 ग्राहकांना अटक केली आहे. पाच महिलांची सुटका करून त्यांना बेळगावच्या महिला सुधार केंद्रात पाठवण्यात आले. लॉज मालक विनायक लक्ष्मण मांजरेकर याच्याविरुद्ध (आयटीपीए) तक्रार नोंदवण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर मंजुनाथ नाईक, एसआय चन्नाबसवा बबली, हेडकॉन्स्टेबल जयराम हम्मान्नवर, कर्मचारी अनुसया बसप्पानवर, ओंकारा वाढवे, मंजुनाथ मुसळी, वासुदेव पारसेकर, ईश्वरा जिन्नावगोला आदींनी या छाप्यात सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर : हलशीवाडी येथे खांब बदलण्याचे काम सुरू; ग्रामस्थांमधून समाधान

Spread the love  खानापूर : हलशीवाडी येथील लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत अशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *