Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

रुक्मिणी नगर आणि उज्वल नगर येथील तरुणांमध्ये तलवारीने हाणामारी; चार जण जखमी

  बेळगाव : बेळगावातील रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये काल रात्री ईद मिलाद मिरवणुकीनंतर क्षुल्लक कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर तलवारी घेऊन हाणामारीत झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की, ईद मिलादची मिरवणूक सुरू असताना रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. पण मिरवणूक आटोपून परतत …

Read More »

दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

  मुंबईमध्ये मुंबईकर ग्रामस्थांचा विक्रमी उपस्थितीत स्नेहमेळावा मुंबई : एका बाजूला संपूर्ण आयुष्य जनतेसाठी खर्ची घालणारा मी आणि दुसऱ्या बाजूला राजकीय हव्यासापोटी विरोधकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगात घालण्याची स्वप्ने बघणारी दुष्ट प्रवृत्ती, अशी ही लढाई आहे. या सगळ्याचा विचार आणि तुलना तुम्हीच करा आणि अशा दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा, असे …

Read More »

बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी राबवले स्वच्छता अभियान

  बेळगाव : नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बेनकनहळी, सावगाव, गणेशपुर, नानावाडी, मंडोळी, हंगरगा, सुरेश अंगडी रोड बोकमुर, बेळगुंदी परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन सावगाव तलावात करण्यात येते. तलाव व परिसरात खूप ठिकाणी व पाण्यामधे प्लास्टिक व निर्माल्य पसरलेले होते म्हणून बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी पुढाकार घेऊन या …

Read More »

उदयोन्मुख धावपटू प्रेम बुरुडचा नागरी सन्मान सोहळा संपन्न

  बेळगाव : कावळेवाडी येथील उदयोन्मुख धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याचा गावात नागरी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयचे अध्यक्ष वाय. पी. नाईक उपस्थित होते. प्रारंभी ऍड. नामदेव मोरे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. गावातील यल्लापा बुरुड यांनी अथक परिश्रम घेऊन गरीब परिस्थितीमध्ये धावपटू …

Read More »

मातृभाषेवर प्रेम करा; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड

  बेळगाव : “मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची, तुकारामांची, सावरकरांची, ज्ञानेश्वरांची आहे. त्यामुळे या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरातील ज्ञानवंत मातृभाषेचे महत्त्व सांगतात तसे ते आपल्या भाषेलाही आहे. त्यामुळे मराठी भाषेतून शिकणाऱ्यानी मनातला न्यूनगंड काढून टाकावा आणि या भाषेतही ज्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्या स्वीकारून जीवनाच सोनं करावं” …

Read More »

हलशी प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर द्या

  खानापूर : खानापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांसह इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांची हाल होत आहे त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणे आवश्यक बनले आहे. तसेच अनेक प्राथमिक केंद्रातील डॉक्टरांवर दोन प्राथमिक केंद्रांचा भार देण्यात आला आहे त्यामुळे अनेक रुग्णांची मोठी अडचण होत आहे. खानापूर तालुक्यातील …

Read More »

अश्विनचा पंजा, टीम इंडियाचा धमाकेदार विजय, बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा

  चेन्नई : टीम इंडियाने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं आव्हान दिले होते. बांगलादेशचा डाव या विजयी आव्हानाच्या प्रत्युत्तरात 234 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. मात्र …

Read More »

ज्योती कॉलेजला सांघिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

बेळगाव : सार्वजनिक पदवी पूर्व शिक्षण विभाग बेळगाव व ज्योती कॉलेज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सांघिक स्पर्धेमध्ये ज्योती कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. या स्पर्धा ज्योती कॉलेजच्या क्रीडांगणावर घेण्यात आल्या. या तालुकास्तरीय स्पर्धेत ज्योती कॉलेजच्या कबड्डी मुलांच्या संघाने अंतिम स्पर्धेत मराठा मंडळ पियू कॉलेज किनये यांच्यावर एकतर्फी …

Read More »

कबड्डी स्पर्धेत कसबा नंदगड ग्रामपंचायत संघ विजेता

  बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायत यांच्या अखत्यारीत व युवा सबलीकरण व क्रीडा क्षेत्र बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुका क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात तोपिनकट्टी ग्रामपंचायत संघाचा पराभव करून कसबा नंदगड ग्रामपंचायत संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये कसबा नंदगड, चन्नेवाडी, भुत्तेवाडी, झुंजवाड खैरवाड, गरबेनहट्टी या गावांचा …

Read More »

खानापूर पीएलडी बँकेला 46.23 लाखाचा नफा : चेअरमन मुरलीधर पाटील

  बँकेच्या स्वतःच्या जागेत लवकरच इमारत उभारणार! खानापूर : खानापूर तालुक्यातील भू- धारक शेतकऱ्यांना अल्प दरात कर्ज व शासनाच्या सुविधा उपलब्ध करून तालुक्यात एक आदर्श बँक निर्माण करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने हाती घेतला आहे. ग्राहकांनी दिलेल्या सहकार्यातून 2023- 24 आर्थिक वर्षात 46.23 लाखाचा नफा बँकेने मिळवला असल्याची माहिती खानापूर पीएलडी …

Read More »