Sunday , September 20 2026
Breaking News

रुक्मिणी नगर आणि उज्वल नगर येथील तरुणांमध्ये तलवारीने हाणामारी; चार जण जखमी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये काल रात्री ईद मिलाद मिरवणुकीनंतर क्षुल्लक कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर तलवारी घेऊन हाणामारीत झाले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, ईद मिलादची मिरवणूक सुरू असताना रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. पण मिरवणूक आटोपून परतत असताना दोन्ही गटात तलवारीने हाणामारी झाली. या घटनेत उज्वल नगर येथील चार जणांच्या मानेला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून मोहम्मद कैफ, साहिल बंडारे, तन्वीर, अहमद अशी जखमींची नावे आहेत. सध्या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी माळ मारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *