Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

…चक्क कन्नडमध्ये औषधांचे प्रिस्क्रिप्शन!

  बंगळुरू : एखाद्या भाषेच्या अस्तित्वाला किंवा नष्ट होण्यास आपणच जबाबदार आहोत. एखाद्या भाषेचे कौतुक, आदर, वापर यामुळे ती भाषा टिकते. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे भाषेबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. त्याचप्रमाणे येथील एका डॉक्टरने आपल्या मातृभाषेवर, कन्नडच्या प्रेमापोटी आता आपल्या कन्नडमध्ये औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात केली आहे. याद्वारे कन्नड प्रेम वेगवेगळ्या प्रकारे …

Read More »

लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!

खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून लक्ष्मी देवीच्या सोन्याच्या 16 पुतळ्या, तसेच 40 ते 50 तोळा चांदीचे दागिने, कमरपट्टा व इतर, सोन्या चांदीचा किमती ऐवज चोरीला गेला आहे. त्याची किंमत अडीच लाखापर्यंत आहे. आज सकाळी पुजाऱ्याच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आली. खानापूर पोलीस स्थानकाला …

Read More »

पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन उत्साहात

  बेळगाव : पाचव्या दिवशीच्या घरगुती गणेशमूर्तीचे आज बुधवारी विसर्जन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले. त्यामुळे महापालिकेतर्फे विसर्जन तलावांवर सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. शहरात यंदा शनिवारी ७ रोजी गणेशमूर्तीचे उत्साहात आगमन झाले होते. त्यानंतर काही जणांनी दीड दिवसाच्या गणपतीला निरोप दिला होता. मंगळागौर झाल्यानंतर पाचव्या दिवशी घरगुती विसर्जन करण्याची …

Read More »

श्री गणेश २०२४ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता प्रताप कालकुंद्रीकर; बेस्ट पोझर मोरेश देसाई

  बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक मार्केट आणि कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालयच्या सभागृहात २० व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना प्रताप कालकुंद्रीकर याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन …

Read More »

लिंगायत आरक्षणासाठी २२ रोजी अधिवेशन

  बसव मृत्युंजय स्वामी; वकील संघटना करणार नेतृत्व निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाला २/अ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून आरक्षण मिळावे, यासाठी पाच वर्षापासून लढा सुरू आहे. तरीही शासनाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. परिणामी राज्यातील लिंगायत समाजातील वकील संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे निश्चित केले आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी …

Read More »

मराठी विद्यानिकेतन शाळेला खो-खो स्पर्धेत दुहेरी मुकुट

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. मराठी विद्यानिकेतन मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्राथमिक विभाग मुलांच्या खो-खो संघाने उपांत्य सामन्यात महांतेश नगर शाळेचा एकतर्फी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात 14 नंबर शाळेचा सलग दुसऱ्यांदा पराभव करत तालुकास्तरीय विजेतेपद मिळविले. …

Read More »

समाज एकसंघ ठेवण्यासाठी सण उत्सवांची रचना

  कमल चौगुले‌; कुर्लीत झिम्मा, फुगडी स्पर्धा निपाणी (वार्ता) : आजच्या धावत्या युगात भारतीय संस्कृतीचा वारसा सणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे शक्य आहे.भारतीय सण उत्सवांची रचना ही सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी केली आहे, असे मत निलगंगा महिला मंच अध्यक्षा कमल चौगुले यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथील एच जे सी …

Read More »

कर्नाटकचे आरोग्यमंत्री सन्माननीय दिनेश गुंडूराव जिजाऊ मंडळाच्या गणरायाच्या चरणी…

  खानापूर : आज कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव, शिवस्मारक चौकातील जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या दर्शनास पोचले.. डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आरोग्यमंत्र्यांना आमच्या गणपती मंडळास भेट देण्याची विनंती केली असता मा. मंत्री महोदयांनी लगेच होकार दर्शविला. आरोग्य मंत्र्याच्या हस्ते गणरायाची आजची आरती संपन्न झाली. जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सन्माननीय दिनेश गुंडूराव …

Read More »

विद्याभारती राज्य अथलेटिक स्पर्धेत संत मीराचे यश

  बेळगाव : बिदर येथे विद्याभारती कर्नाटक आयोजित विद्याभारती बिदर जिल्हा पुरस्कृत राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण तीन रौप्य एक कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात नताशा चंदगडकर हिने लांब उडी व तिहेरी उडीत दोन सुवर्णपदक, समीक्षा …

Read More »

येळ्ळूर सिद्धेश्वर मंदिर नूतनीकरण लोकार्पण सोहळा सोमवारी

  येळ्ळूर : सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील सिद्धेश्वर मंदिराचे सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळ यांच्या पुढाकाराने व गावातील व गावाबाहेरील असंख्य देणगीदारांच्या सहकार्यातून, नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवार (ता. 16) रोजी सकाळी 11-00 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी असंख्य भाविक भक्त, दानशूर …

Read More »