Sunday , July 26 2026
Breaking News

विद्याभारती राज्य अथलेटिक स्पर्धेत संत मीराचे यश

Spread the love

 

बेळगाव : बिदर येथे विद्याभारती कर्नाटक आयोजित विद्याभारती बिदर जिल्हा पुरस्कृत राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण तीन रौप्य एक कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात नताशा चंदगडकर हिने लांब उडी व तिहेरी उडीत दोन सुवर्णपदक, समीक्षा बुद्रुकने 3000 मीटर धावणे रौप्यपदक, मनस्वी चतुरने थाळीफेक रौप्यपदक, भावना बेर्डेने 100 मीटर धावणे रौप्यपदक, तर साक्षी राजाराम पाटील हिने 3 किलोमीटर चालणे कांस्यपदक पटकाविले आहे.
वरील खेळाडूंची गुंटूर विजयवाडा येथे 14 व 15 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विद्याभारती क्षेत्रीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे यासाठी हा संघ गुरुवार तारीख 12 रोजी हुबळी मार्गे विजयवाड्याला क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट आनंद कुलकर्णी यांच्यासह रवाना होत आहे या संघाला क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील मयुरी पिंगट, यश पाटील, शिवकुमार सुतार यांचे मार्गदर्शन तर शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व पालक वर्गांचे प्रोत्साहान लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *