Saturday , November 8 2025
Breaking News

श्री गणेश २०२४ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता प्रताप कालकुंद्रीकर; बेस्ट पोझर मोरेश देसाई

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक मार्केट आणि कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालयच्या सभागृहात २० व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना प्रताप कालकुंद्रीकर याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन श्री गणेश चषकाचे विजेतेपद पटकाविले तर बेस्ट पोझर हा सर्वोच्च किताब मोरेश देसाई याने निर्विवादपणे संपादन केला.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती शिरीष गोगटे, भाजप नेते डॉ. रवी पाटील, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना अध्यक्ष अविनाश पोतदार, कृष्णामूर्ती एस, विजय तळवार, अजित सिद्धनावर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी शिरीष गोगटे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी अमित किल्लेकर, राजू हंगिरगेकर, एम. गंगाधर, हेमंत हावळ, सचिन हंगेरगेकर, विशाल मुरकुंबी, श्रीराम कुलकर्णी, गिरीश पाटणकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. २०० हून अधिक शरीर सौष्ठव पटूनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

अंतिम स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात डॉ. रवी पाटील, विशाल मुरकुंबी, आशियाई पंच अजित सिदण्णावर, मोतीचंद दोरकाडी, श्रीराम कुलकर्णी, अमित किल्लेकर, अनेक मान्यवर यांच्या हस्ते विजेत्या,उपविजेत्या आणि तिसरा क्रमांक विजेत्या यांना सुवर्ण, रौप्य, कास्य पदके आणि चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूंना रोरव बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

अंतिम निकाल

५५ किलो-१) आदर्श कल्लेहोळकर, २) मंजुनाथ कलडगी, ३) तुकाराम गौडा, ४) केतन भातकांडे, ५) रोनक गवस.

६० किलो-१) फिरोज वडगावकर, २) निलेश गोरल, ३) गजानन गावडे, ४) आदित्य सैनुचे, ५) आकाश गौडा.

६५ किलो-१) विशाल भोसले, २) संतोष हुंदरे, ३) विजय निलजी, ४) शुभम नारळकर, ५) रितेश हनुमंताचे.

७० किलो-१) आदित्य यमकानावर ,२) सुनील भातकांडे, ३) पवन सावंत, ४) मंजुनाथ कोल्हापुरे, ५) रमेश मंकनावर.

७५ किलो-१) प्रताप कालकुंद्रीकर, २) मंजुनाथ सोनटक्के, ३) प्रशांत गौडा, ४) मोरेश देसाई, ५) संदीप पावले.

८० किलो-१) गणेश पाटील, २) मनीष सुतार, ३) विनायक अनगोळकर, ४) रोनित माकणे.

८० किलो वरील-१) राहुल कलाल, २) पृथ्वीराज कोलकार, ३) सुजित शिंदे, ४) शिवानंद केडगावकर, ५) युवराज पाटील.

About Belgaum Varta

Check Also

दगडफेकीत सहा पोलिस जखमी : पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद

Spread the love  बेळगाव : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला नाही. बेळगावचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *