Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

लक्ष्मी रोड भारतनगर शहापूर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर

  बेळगाव : नुकतीच श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी रोड, भारतनगर शहापूर बेळगाव यांची वार्षिक बैठक श्री महागणपती मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीत मागील वर्षाचा जमाखर्च आणि नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी श्री. सचिन शांताराम केळवेकर यांची तर उपाध्यक्षपदी दीपक अशोक सावळेकर यांची निवड झाली. सचिवपदी संदीप …

Read More »

खानापूरातील गावे स्थलांतर संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत तीन ठराव मंजूर!

  खानापूर : भीमगड अभयारण्यात असलेल्या 9 गावांचे स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या संदर्भात नऊ गावातील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व या विषयावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक राजा श्री शिवछत्रपती शिवस्मारक येथे बोलाविली …

Read More »

राज्यातील हमी योजना सुरूच रहातील; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

  बेळगावातील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीची घोषणा बंगळूर : राज्यात हमी योजना सुरूच राहणार आहेत. हमी योजनांमुळे दिवाळखोरीचे भाकीत करणाऱ्यांना उत्तर मिळाले असून, येत्या काळात आर्थिक विकास साधून आम्ही त्यांना उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी (ता. १५) सांगितले. दरम्यान, बेळगावात काँग्रेसचे अधिवेशन होऊन शंभर वर्षे झाली. आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारिणी …

Read More »

चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे सुरूच

  बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी अखिल कर्नाटक रयत संघ, अखिल कर्नाटक महिला रयत संघ आणि हरित सेना बेंगळुरू तसेच कर्नाटक राज्य शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात आज चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी धरणे धरले. म्हादई – कळसा – भांडुरा प्रकल्पाचे कामकाज लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या पंपसेटसाठी आणलेला …

Read More »

कोलकात्ता घटनेच्या निषेधार्थ उद्या बेळगावात सरकारी, खासगी रुग्णालयांची ओपीडी सेवा बंद

  बेळगाव : पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या दि. 17 रोजी बेळगावातील सरकारी, खासगी रुग्णालयांची ओपीडी सेवा बंद राहणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे बेळगावचे अध्यक्ष डॉ. रवींद्र अनगोळ यांनी दिली. पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेला आठवडा उलटून गेला तरी सरकारने कोणतीही कारवाई …

Read More »

पंचमसाली लिंगायत आरक्षण लढ्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बेळगावात पंचमसाली लिंगायत अधिवक्ता महापरिषद

  बेळगाव : पंचमसाली लिंगायत आरक्षण लढ्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बेळगावात पंचमसाली लिंगायत अधिवक्ता महापरिषद घेणार असून बेळगाव अधिवेशनात संघर्षाबाबत निर्णय घेणार असल्याचे श्रीजयमृत्युंजय यांनी सांगितले. बेळगाव येथील जिल्हास्तरीय वकिलांची गुरुवारी रात्री एका खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही लिंगायत पोटजातींना ओबीसी आरक्षणासाठी प्रचार …

Read More »

मुजावर आर्केड येथील लिफ्ट तुटली; लोकांची धावपळ

  बेळगाव : नेहरू नगर येथील मुजावर आर्केड येथे लिफ्ट तुटून लोक आत अडकल्याची घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट तुटली आणि त्यात सुमारे सात जण होते. आर्केड कर्मचारी आणि तांत्रिक तज्ज्ञ लिफ्टची दुरुस्ती करत आहेत. काही दिवसांपूर्वीच लिफ्टच्या खराब परिणामामुळे संपूर्ण कारखाना जळून खाक झाला होता, त्यामुळे शहरातील नागरिक हैराण …

Read More »

श्री गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी चौक सावगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

  बेळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी चौक सावगावच्या २०२४ सालासाठीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी कल्लाप्पा भरमा पाटील तर उपाध्यक्षपदी अमृत पुंडलिक वेताळ यांची गुरुवार (दि.१५) गावातील माऊली मंदिरात पार पडलेल्या मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. खजिनदारपदी प्रशांत यल्लप्पा कदम उपखजिनदार प्रभाकर मीनाजी पाटील, सेक्रेटरी …

Read More »

दिवाळीनंतरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक

  नवी दिल्ली : लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात पाऊस झाला …

Read More »

जम्मू- काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान

  नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि. 16 ऑगस्ट) हरियाणा आणि जम्मू- काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर तीन टप्प्यांत मतदान होईल. तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर दोन्ही राज्यात 4 ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य …

Read More »