Sunday , July 26 2026
Breaking News

लक्ष्मी रोड भारतनगर शहापूर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर

Spread the love

 

बेळगाव : नुकतीच श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी रोड, भारतनगर शहापूर बेळगाव यांची वार्षिक बैठक श्री महागणपती मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीत मागील वर्षाचा जमाखर्च आणि नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी श्री. सचिन शांताराम केळवेकर यांची तर उपाध्यक्षपदी दीपक अशोक सावळेकर यांची निवड झाली. सचिवपदी संदीप अशोक पाटील, उपसचिव विवेक नांदवडेकर, खजिनदारपदी मेघन तारीहाळकर, उपखजिनदारपदी अक्षय पाटील यांची निवड करण्यात आली. श्री महागणपती गणेशोत्सव मंडळाचे हे पन्नासावे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यावर्षी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. बैठकीला मंगेश बाळेकुंद्री, सुंदर केळवेकर, शुभम नांदवडेकर, नवीन वेर्णकर, अक्षय हणमशेठ, नितीन केळवेकर, अविनाश पाटील, गजानन पाटील, स्वप्नील बेळवटकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *