Monday , September 21 2026
Breaking News

कोलकाता येथे घडलेल्या अमानुष घटनेचा भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडून निषेध

Spread the love

 

बेळगाव : कोलकाता येथे घडलेल्या अमानुष घटनेचा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव आणि भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आज दि. 17 ऑगस्ट रोजी देशभरात होणाऱ्या शांततापूर्ण निदर्शनाला त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त करून घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहनही डॉ. सरनोबत यांनी केले आहे.

कठुआ आणि हाथरस सारख्या घडलेल्या अशाच घटनांचा निषेध करणाऱ्यांसाठी एकत्रित निषेध केला त्याचप्रमाणे “सर्वांनी एकत्र राहून न्यायाची मागणी करण्याची वेळ आली आहे” असे सांगून त्यांनी आज डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदमध्ये सरकारी, खासगी डॉक्टरांनी सहभागी होऊन निषेध करण्याचे आवाहन त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

देशभरातील डॉक्टर या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि त्या नराधमावर कारवाईची मागणी करण्यासाठी एकत्र येणार आहेत. या बंदला आपला पाठिंबा डॉ. सरनोबत यांनीही दर्शवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *