Sunday , July 26 2026
Breaking News

श्री गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी चौक सावगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी चौक सावगावच्या २०२४ सालासाठीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी कल्लाप्पा भरमा पाटील तर उपाध्यक्षपदी अमृत पुंडलिक वेताळ यांची गुरुवार (दि.१५) गावातील माऊली मंदिरात पार पडलेल्या मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.

खजिनदारपदी प्रशांत यल्लप्पा कदम उपखजिनदार प्रभाकर मीनाजी पाटील, सेक्रेटरी ज्ञानेश्वर निंगाप्पा कदम आणि उपसेक्रेटरीपदी योगेश काकतकर यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे यंदा ४२ वर्षात पदार्पण होत असून पाच सप्टेंबर रोजी आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार असून दरवर्षी हालता देखावा सादर केला जातो. यंदा पृथ्वी प्रदक्षिणा हा देखावा असणार आहे. रविवार (दि.१८) ऑगस्ट रोजी मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *