Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस : सर्वत्र अलर्ट जाहीर?

  बेंगळुरू : येत्या तीन दिवस राज्याच्या किनारपट्टी, डोंगराळ प्रदेश आणि उत्तरेकडील भागात मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या तीन दिवसांत किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असून उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड आणि उडुपीमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. शिमोग्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. …

Read More »

राज्यपालांच्या नोटीसला मंत्रिमंडळ बैठकीत आक्षेप; नोटीस मागे घेण्याचा ठराव

  बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) बेकायदेशीर जमीन वाटप घोटाळ्याबाबत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेल्या नोटीसला गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र आक्षेप घेण्यात आला. आज मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुडा घोटाळ्याबाबत राज्यपालांनी बजावलेली नोटीस मागे घेण्याची मागणी करण्याचा निर्णय …

Read More »

मंत्रिमंडळातीस सर्व सदस्य मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी खंबीर

  कावेरी निवासस्थानी अल्पोपहार बैठक बंगळूर : मुडा घोटाळाप्रकरणी अडचणीत असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी एकमताने घेतला आहे. मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवायला हवा, असे सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी राज्यपालांकडे सादर केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ उभे …

Read More »

येळ्ळूर येथील 30 वर्षाचा सार्वजनिक लक्ष्मी स्थळाचा वाद निकालात!

  बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौक (लक्ष्मी स्थळ) येथील 30 एक वर्षे वादात असलेल्या सार्वजनिक लक्ष्मी स्थळाचा आज येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने निकाल लावण्यात आला. येळ्ळूर ग्राम पंचायतचे अध्यक्ष सतीश पाटील असताना या जागेच्या प्रश्नाला स्थानिक लोकांना नोटीसा पाठवून त्यांच्या जागेचे कागद पत्र मागून घेऊन स्थळाची पाहणी करून तेथील …

Read More »

देवाच्या नावाने प्राण्यांचा बळी देऊ नका : दयानंद स्वामीजी

  बेळगाव : पशुबळी बंदीसाठी जनजागृती केल्यामुळे वडगावच्या ग्रामदेवता मंगाई देवीच्या यात्रेत पशुबळी पूर्णपणे रोखण्यात यश आले, अशी प्रतिक्रिया जागतिक प्राणी कल्याण मंडळ, बसव धर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी व्यक्त केली. बेळगाव शहरात होणाऱ्या अनेक यात्रांपैकी मोठ्या प्रमाणात भरविल्या जाणाऱ्या वडगावच्या श्री मंगाई देवीच्या यात्रेत यंदा प्रथमच पशुबळी प्रथा …

Read More »

गरजू मुलाला यंग बेळगाव फाउंडेशनची शैक्षणिक मदत!

  बेळगाव : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कष्टाळू गरजू विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक शुल्कासाठी मदत करण्यासाठी पाऊल उचलताना यंग बेळगाव फाउंडेशनने माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली आवश्यक शैक्षणिक निधी आयएमए इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यंग बेळगाव फाउंडेशनच्या सदस्यांनी नुकतीच एका स्थानिक हॉटेलला भेट दिली …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

  बेळगाव : बदली करुन घेतलेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक किंवा अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्याशिवाय शिक्षकांना बदली झालेल्या ठिकाणी सोडू नये तसेच खानापूर तालुक्यातील मराठी शाळांचा पदभार मराठी विषयांच्या शिक्षकांकडे देण्यात यावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांच्याकडे करण्यात आली आहे. खानापूर तालुका समितीचे …

Read More »

एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली!

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे सध्या कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून ती दुथडीवरून वाहत आहे. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा करणारी जॅकवेल खराब झाली असून जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी हेस्कॉमचे कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली. गुरुवारी सकाळी सदर घटना घडली असून सर्वजण सुरक्षित आहेत. बोट …

Read More »

काकती येथील भूखंड आणि बांधलेले घर परस्पर नावावर करून वृद्ध महिलेची फसवणूक!

  बेळगाव : कष्ट करून विकत घेतलेला भूखंड आणि बांधलेले घर एका व्यक्तीने परस्पर नावावर करून घेऊन एका वृद्ध महिलेची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. निराधार असलेली ही वृद्ध महिला सध्या हुबळी येथील सिद्धारूढ मठात वास्तव्यास आहे. उतारवयात आधार देणारी मुले नाहीत. नातवंडे नाहीत. पतीचेही निधन झाले आहे. या …

Read More »

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्याच्या वारसाला मदतीची गरज!

  बेळगाव : 1986 साली कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हुतात्मा झालेले बेळगुंदी येथील हुतात्मा झालेले भावुक चव्हाण यांचे सुपुत्र श्री. शट्टुपा भावकू चव्हाण हे आजाराने उपचार घेत आहेत. सध्या त्यांची परिस्थिती एकदम नाजूक असून आर्थिक परिस्थिती ही नाजूक झाली आहे. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी समस्त सीमाभागातील दानशूर व्यक्तींना, समितीच्या …

Read More »