Tuesday , April 22 2025
Breaking News

एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली!

Spread the love

 

बेळगाव : मुसळधार पावसामुळे सध्या कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून ती दुथडीवरून वाहत आहे. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा करणारी जॅकवेल खराब झाली असून जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी हेस्कॉमचे कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली. गुरुवारी सकाळी सदर घटना घडली असून सर्वजण सुरक्षित आहेत.

बोट उलटल्यानंतर हेस्कॉम कर्मचारी आणि वॉटरमन या दोघांनी नदीकाठावरील झाडाला धरून आपला जीव वाचवला. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून लाईफ जॅकेटमुळे सर्वजण सुरक्षित बचावले आहेत. एनडीआरएफच्या उलटलेल्या बोटीमध्ये एकूण 6 जण होते. बोट उलटताच काठावरील दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने एनडीआरएफ जवानांनी तात्काळ मदतकार्य हाती घेऊन नदीपात्रात पडलेल्या सहाही जणांचा जीव वाचवला.

About Belgaum Varta

Check Also

शुभम शेळके हद्दपारीवर पुढील सुनावणी 7 मे रोजी

Spread the love  बेळगाव : समाज माध्यमावर प्रतिक्रिया देऊन दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा ठपका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *