बेळगाव : 1986 साली कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हुतात्मा झालेले बेळगुंदी येथील हुतात्मा झालेले भावुक चव्हाण यांचे सुपुत्र श्री. शट्टुपा भावकू चव्हाण हे आजाराने उपचार घेत आहेत. सध्या त्यांची परिस्थिती एकदम नाजूक असून आर्थिक परिस्थिती ही नाजूक झाली आहे. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी समस्त सीमाभागातील दानशूर व्यक्तींना, समितीच्या कार्यकर्त्यांना आणि मराठी भाषिकांना आवाहन करण्यात येते आहे.
शट्टुपा भावकु चव्हाण म. ए. समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून गेल्या अनेक वर्षांपासून समितीच्या प्रत्येक कार्यामध्ये कार्य करून आपले योगदान देत असतात. शट्टुपा चव्हाण यांच्या मातोश्रीचे नुकतेच निधन झाले आहे. यामुळे त्यांना महाराष्ट्र सरकारकडून हुतात्मा झालेल्यांना देण्यात येणारे मानधन (पेन्शन) बंद झाले आहे. शट्टूपा चव्हाण हेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते तसेच त्यांना मधूमेह हा आजार असून तो आजारही आता वाढत असल्यामुळे त्यांना अधिक उपचाराकरिता माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, दीपक पावशे, संजय पाटील, पुंडलिक पावशे यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. यामुळे शट्टूपा चव्हाण यांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांनी, म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी, दानशूर व्यक्तींनी मदत करून हातभार लावावा अशी विनंती आहे.
शट्टुपा चव्हाण यांचे बचत खाते कॅनरा बँक हनुमान नगरमध्ये असून सदर बचत खात्याचा क्रमांक 2912101006116 असून, सदर बँकेचा आयएफसी क्रमांक CNRB 0002912, हा आहे. फोन पे करणाऱ्यांनी 7847886025 या क्रमांकावर फोन पे रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.