Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

धो धो पावसातच नेला “त्या” दुर्दैवी महिलेचा मृतदेह आणि केले अंत्यसंस्कार..

  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगांव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षदा …

Read More »

ठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी : मनोज जरांगे पाटील

  मुंबई : उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, आपल्या समाजाला मोठे करायचे असेल तर सर्वांनी एकत्र …

Read More »

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर अर्धवट कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणही जखमी झाले नाही. कोसळलेले घर पत्रकार सुनील शंकर पाटील यांचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्य जेवत असताना, शेजाऱ्यांनी त्यांना घराची भिंत पडल्याची खबर दिली. घराची भिंत कोसळण्यापूर्वी पाटील कुटुंबीयांनी सुरक्षित …

Read More »

सौंदत्ती रेणुका यल्लमा मंदिर प्राधिकरणास मंजुरी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लमा मंदिराच्या विकासाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतच्या श्री रेणुका यल्लमा मंदिर विकास प्राधिकरण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. सौंदत्तीतील रेणुका मंदिराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत आहे. त्याकरिता धर्मादाय मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या …

Read More »

विद्याभारती राज्य फुटबॉल स्पर्धा; बेळगाव, बेंगळूर, मंगळूर अंतिम फेरीत

  बेळगाव : माळमारुती येथील स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर संतमीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती राज्यस्तरीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या विविध गटात बेंगळूर, मंगळूर, बेळगांव जिल्ह्यातील संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक मुलांच्या 14 वर्षाखालील गटात पहिल्या उपांत्य सामन्यात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना २६ व २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर

  कोल्हापूर (जिमाका) :  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील शाळा २६ व २७ जुलै …

Read More »

गोकाक, मुडलगी, रायबाग, हुक्केरी तालुक्यातील शाळांना सुट्टी

  बेळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गोकाक, मुडलगी, रायबाग, हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुक्रवार दि. २६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश बेळगाव जिल्ह्यातील शासकीय, सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना लागू आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा …

Read More »

अंत्यसंस्कार करण्यास गुडघ्याभर पाण्यातून नेण्यात आला वृद्ध महिलेचा मृतदेह!

  बेळगाव : बेळगाव येथील अमन नगरमध्ये परिसरात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आणि त्याचदरम्यान घरातच पाय घसरून पडल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. महबूबी आदम साहेब मकानदार (७९) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. अंत्यसंस्कार करण्यातही मोठी अडचण निर्माण झाली. मृतदेह घेऊन जाण्यासाठीही कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. शिवाय, …

Read More »

संभाव्य पूराच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रायबाग तालुक्यातील विविध भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. जमखंडी-मिरज राज्य महामार्गावरील कुडची पूल पाण्याखाली गेला असून, पाण्याच्या पातळीतील चढउताराची माहिती मागविण्यात आली. नंतर त्यांनी हिरेबागेवाडी येथील पूरस्थितीची पाहणी …

Read More »

डॉ. दत्तात्रय देसाई यांचा ‘दस्तक ..अनसुनी आहट’ हा हिंदी कविता संग्रह प्रकाशित

  बेळगाव : बेळगावचे सुपत्र डॉ. दत्तात्रय ज्ञानदेव देसाई यांचा पहिला कविता संग्रह “दस्तक ….. अनसुनी आहट” याचे प्रकाशन हिंदी प्रचार सभा हैद्राबाद येथे करण्यात आले… यावेळी दक्षिण भारत हिन्दी प्रचार सभा आंध्रप्रदेश व तेलंगाणाचे अध्यक्ष श्री. पी. ओबय्या, सचिव श्रीमती ए. जानकी, कोषाध्यक्ष श्री. मुहम्मद खासीम, प्रबंध निधिपालक श्री. …

Read More »