Sunday , September 20 2026
Breaking News

गोकाक, मुडलगी, रायबाग, हुक्केरी तालुक्यातील शाळांना सुट्टी

Spread the love

 

बेळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गोकाक, मुडलगी, रायबाग, हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुक्रवार दि. २६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
हा आदेश बेळगाव जिल्ह्यातील शासकीय, सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना लागू आहे.
बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सोमवारपासून सुट्टी आहेत त्या शुक्रवार पर्यंत असणार आहेत. पावसाचा जोर या दोन तालुक्यात आणखी वाढल्यास शनिवारी देखील शाळांना सुट्टी दिली जाऊ शकते आणि सोमवारी शाळा सुरू होऊ शकतात अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *