Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र जीनगौडा शाळेचे सचिव कुंतीसागर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, देवेंद्र जीनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील. संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. …

Read More »

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा आंदोलन : आबासाहेब दळवी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याची दखल घेऊन ज्या जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी …

Read More »

राज्यातील १५ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

  बंगळुरू : राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु, शिमोगा, दावणगेरे, हसन, यादगिरी, बेळगाव, धारवाड, कलबुर्गी, हावेरी आणि रायचूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु आणि शिमोगा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर …

Read More »

दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन दिलासा मिळाला आहे. पण त्याच्या अटकेचे प्रकरण ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवले आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ केजरीवाल यांच्या …

Read More »

भूस्खलनानंतर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या २ बस नदीत वाहून गेल्या, ६० जण बेपत्ता

  नेपाळमध्ये पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. अशामध्ये भूस्खलनानंतर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दोन बस नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास नेपाळमधील नारायणघाट- मुंगलिंग मार्गावरील मदन-आशीर हैफा येथे भूस्खलन झाले. या भूस्खलनानंतर दोन प्रवासी बस त्रिशूली नदीत वाहून …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्रांचे वितरण

  खानापूर : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी स्वच्छ आणि शिस्तीने राहण्याचे शिकावे असे उद्गार निट्टूर गावचे सुपुत्र शिक्षणप्रेमी श्री. सुरज गणेबैलकर यांनी विद्यार्थ्यांना ओळखपत्र वितरणावेळी काढले. सरकारी शाळांच्या विकासासाठी सध्या शिक्षकांसोबत काही जागरूक पालक सुद्धा प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा निट्टूर येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रेमी शाळेचे …

Read More »

कालकुंद्री गावामधील दोन तरुण सीए परीक्षेत उत्तीर्ण

  कलकुंद्री : सरकारी अधिकाऱ्यांचा गाव म्हणून चंदगड तालुक्यात नाव असलेल्या कालकुंद्री गावामधील दोन तरुण आज ‘चार्टर्ड अकाउंट’ (सीए) परीक्षा उत्तीर्ण झाले. यामुळे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. विक्रम तुकाराम पाटील व स्वप्निल वसंत पाटील या दोघांनी आज दि. ११ जुलै २०२४ रोजी सीए पदाला गवसणी घालत गावच्या शिरपेचात मानाचा …

Read More »

भारत विकास परिषदेचा राष्ट्रीय स्थापना दिवस उत्साहात

  सीए श्रीनिवास शिवणगी आणि डॉ. मिलिंद हलगेकर सन्मानित बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे 62 वा स्थापना दिवस, डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकौंटंट डे असा संयुक्त कार्यक्रम बुधवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून सीए श्रीनिवास शिवणगी, डॉ. मिलिंद हलगेकर आणि डॉ. उज्वल हलगेकर उपस्थित …

Read More »

रोटरी इ क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

  बेळगाव : रोटरी इ क्लबचा गोगटे कॉलेजच्या वेणूगोपाल सभागृहात पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. रो. लक्ष्मी पावन मुतालिक यांची 2024-25 सालासाठी रोटरी इ क्लबच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार, माजी अध्यक्षा रो. ज्योती मठद, माजी सचिव रो. आशुतोष डेव्हिड, नवनिर्वाचित …

Read More »

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी पंचमसाली श्रींचे पत्र आंदोलन

  बेळगाव : कुडलसंगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आज महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी पंचमसाली समाजाच्या 2अ आरक्षणासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविण्याच्या मागणीसाठी मागणी पत्र आंदोलन करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात पंचमसाली समाजाला 2अ आरक्षण देण्यासाठी समाजाच्या मंत्री व आमदारांना आवाज उठवण्यास भाग पाडणे हा …

Read More »