Sunday , September 20 2026
Breaking News

कालकुंद्री गावामधील दोन तरुण सीए परीक्षेत उत्तीर्ण

Spread the love

 

कलकुंद्री : सरकारी अधिकाऱ्यांचा गाव म्हणून चंदगड तालुक्यात नाव असलेल्या कालकुंद्री गावामधील दोन तरुण आज ‘चार्टर्ड अकाउंट’ (सीए) परीक्षा उत्तीर्ण झाले. यामुळे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.
विक्रम तुकाराम पाटील व स्वप्निल वसंत पाटील या दोघांनी आज दि. ११ जुलै २०२४ रोजी सीए पदाला गवसणी घालत गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कालकुंद्री मध्ये यापूर्वी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, वनअधिकारी आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, शैक्षणिक व वैद्यकीय आदी अनेक क्षेत्रात अधिकारी असले तरी सीए परीक्षा उत्तीर्ण झालेले हे पहिलेच दोघे आहेत. त्यामुळे यांचा वेगळेपणा लक्षात येतो.
विक्रमचे वडील तुकाराम कृष्णा पाटील हे शेतकरी असून ते चौथी पास आहेत. त्याची आई रेणुका ही अल्पशिक्षित शेतकरी असतानाही त्यांच्या मुलग्याने सीए पदाला घातलेली गवसणी कौतुकास्पद आहे. त्याचे ध्येय हे महाविद्यालय जीवनापासून सुरू झाले.
तो कोवाड केंद्रामध्ये सुद्धा प्रथम आला होता. तर स्वप्निलचे वडील वसंत पांडुरंग पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांची अभ्यासातील चिकाटी आणि मेहनत तालुक्यातील तरुणांना दिशा देणारी आहे. विक्रमच्या यशाबद्दल त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

Spread the love  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *