Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

शहर समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

  शरद पवार 2 सप्टेंबर रोजी बेळगावात बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आठ वाजता बारामती येथे गोविंद बाग या श्री. शरद पवार यांच्या निवासस्थानी श्री. शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि याप्रसंगी महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा यासाठी प्रयत्न करण्याचे …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार; तर दोन जवान शहीद

  जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले असून दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती सैन्यातील अधिकार्‍यांनी दिली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी मोदेरगाम गावात पहिली चकमक झाली. त्यानंतर सायंकाळी फ्रिसल या गावी दुसरी …

Read More »

सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू, सुरतमधील घटना

  सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. काही लोक अडकले असण्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आहे. या ठिकाणी मदत आणि बचावाकार्य सुरु आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन्हीची पथके या ठिकाणी कार्यरत आहेत. घटनास्थळी महापौरांची …

Read More »

शिमोगा येथे अपघातात तिघांचा मृत्यू, पाच जण जखमी

  बंगळूर : शिमोगा येथे शनिवारी दोन मोटारमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. शिमोगा तालुक्यातील मुद्दीनकोप्प ट्री पार्क येथे लायन सफारीजवळ हा अपघात झाला. शिमोगाहून सागरकडे जाणारी इनोव्हा मोटामर आणि सागरहून शिमोग्याच्या दिशेने येणारी स्विफ्ट मोटार …

Read More »

राज्यात डेंगीचा उद्रेक; सक्रिय डेंगी रुग्णांची संख्या ३४३

  झिका विषाणूचीही भीती बंगळूर : राज्यातील अनेक भागात डेंगी तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे लोकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. हसनमध्ये डेंगीच्या तापाने सहा मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, बंगळुरमध्ये एका ११ वर्षीय मुलाचा डेंगी तापाने मृत्यू झाला. याशिवाय, प्राणघातक झिका विषाणू देखील दिसून आला आहे, ज्यामुळे लोक अधिक …

Read More »

श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यात डोंगर परिसरातील गावांचाही विकास साधा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

  श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरणाच्या 1816 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी; शासनाकडे होणार सादर कोल्हापूर (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर विकास आराखडा सादर करताना यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावर येणारे भाविक व डोंगर परिसरातील रहिवाशांच्या सोयी सुविधांचा विचार करा. या परिसरातील 23 गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून …

Read More »

चोर्ला घाटात कार अपघात; बेळगावच्या युवकाचा मृत्यू

  खानापूर : मित्रांसोबत गोव्याला जात असताना कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आपटली. या अपघातात संकेत बबन लोहार (वय. 26 रा. दुर्गामाता रोड, गांधीनगर, बेळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत मित्रांसोबत गोव्याला जात होता. दरम्यान कारची रस्त्याकडेला …

Read More »

निपाणी तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली शिवाजी विद्यापीठचे व्ही. एन. शिंदे यांची भेट

  निपाणी : निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मुख्य सचिव रजिस्टर डॉक्टर व्ही. एन. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील 865 गावातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, शेतकरी मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी एमबीए, बीसीए, एमसीए, बीएड यासारखे उच्च …

Read More »

मंदिराच्या मालमत्तेप्रकरणी माजी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात प्रमोद मुतालिकांचे आरोप

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील श्री मारुती मंदिराची सुमारे २०० कोटी रुपयांची ९३ एकर जमीन बळकावणाऱ्या बेळगावच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र लढा देऊ, असा इशारा श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक राज्यात …

Read More »

संत मीरा अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर यांना विजेतेपद

  बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर देवेंद्र जिंनगौडा स्कूल शिंदोळी आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ, शांतीनिकेतन स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. प्राथमिक गटातील अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने संत मीरा अनगोळ शाळेचा पेनाल्टी शुटआऊटवर 5-4 असा पराभव करीत विजेतेपद …

Read More »