Monday , September 21 2026
Breaking News

चोर्ला घाटात कार अपघात; बेळगावच्या युवकाचा मृत्यू

Spread the love

 

खानापूर : मित्रांसोबत गोव्याला जात असताना कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आपटली. या अपघातात संकेत बबन लोहार (वय. 26 रा. दुर्गामाता रोड, गांधीनगर, बेळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत मित्रांसोबत गोव्याला जात होता. दरम्यान कारची रस्त्याकडेला धोकादायक स्थितीत असलेल्या झाडाला धडक बसली. या अपघातात संकेतचा जागीच मृत्यू झाला. चोर्ला घाटातील केरी जवळ हा अपघात घडला. तो आपल्या अन्य दोन मित्रांसोबत काही कामानिमित्त गोव्याला जात होता. त्याचा मित्र कार चालवत होता. तर संकेत चालकाच्या बाजूला बसला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने झाडाला धडक दिली. चालकाशेजारी बसलेला संकेत गंभीर जखमी झाला. रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने इतर दोघेजण बचावले.

संकेत हा श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता होता. त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची वाळपई पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *