Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

हिंडलगा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात स्वच्छता मोहिम

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला प्रत्येक भारतीयांनी मंदिराची स्वच्छता करण्याची विनंती केली आहे त्यानुसार नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत त्यांनी हिंडलगा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन स्वच्छता राबविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील काळूराम मंदिरात जाऊन स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर भाजपचे …

Read More »

343 वा संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा बेळगावात मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव (प्रतिनिधी) : स्वराज्य आणि धर्मनिष्ठा जोपासुन शुरविर संभाजीराजेंनी मुघल साम्राज्याशी कडवी झुंज देत 120 युद्ध खेळून ती जिंकली आणि मराठेशाहीचे अस्तित्व अबाधीत ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडविण्यांत शूरवीर संभाजीराजे यांनी मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन भाजपाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांनी केले. धर्मवीर …

Read More »

भाजपच्या नुतन ३९ जिल्हाध्यक्षाची नियुक्ती

  बेळगाव शहराध्यक्षपदी गीता सुतार, बेळगाव ग्रामीण अध्यक्षपदी सुभाष पाटील; चिक्कोडीच्या अध्यक्षपदी अप्पाजीगोळ यांची वर्णी बंगळूर : राज्य भाजपने जिल्हा शाखासाठी नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी ३९ संघटनात्मक जिल्ह्यांसाठी अध्यक्षांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर अध्यक्षपदी गीता सुतार, बेळगाव ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष पाटील, …

Read More »

रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्सतर्फे प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या निपाणी शाखेचे सल्लागार प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे यांचा मॉरिशिअस येथे शोधप्रबंध सादर झाला आहे. त्यानिमित्त येथील शाखा अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे …

Read More »

बोरगाव आरोग्य शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील जय गणेश मल्टीपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी व गौरी गणेश महिला सोसायटीतर्फे संक्रांतीनिमित्त सर्व रोग निदान आरोग्य शिबीर पार पडले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष अभय मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील व उद्योजक अभिनंदन …

Read More »

बेळगावचा हॉकी संघ म्हैसूरला अ.भा. निमंत्रित कपसाठी रवाना

  बेळगाव : हॉकी बेळगावचा संघ हॉकी म्हैसूर येथे आयोजित 18 ते 21 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय निमंत्रित कपसाठी आज निवड करण्यात आला. संघाला शुभेच्छा देण्यासाठी लेले मैदानावर समारंभ आयोजित करण्यात आला होता, तसेच यावेळी हॉकी बेळगावतर्फे खेलो इंडिया स्पोर्ट्स अथाॅरिटी आॕफ इंडिया हॉस्टेलसाठी 10 मुलींची मडीकेरी येथील निवड चाचणीसाठी …

Read More »

विवेकानंद सौहार्द को-ऑप. सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद जयंती साजरी

  बेळगाव : येथील कॉलेज रोडवरील नामांकित विवेकानंद सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ऑस्ट्रेलिया येथील अभ्यास दौरा यशस्वी करून आलेली स्नेहा रामचंद्र एडके हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्हाईस …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांच्या वतीने सुचित केल्याप्रमाणे या भाषा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचा उद्घाटन सोहळा मराठी …

Read More »

इंडिगोच्या प्रवाशांवर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ

  मुंबई : एअर इंडियानंतर सर्वाधिक वेळा ढिसाळ कारभाराच्या तक्रारी येत असलेली विमानसेवा गो इंडिगोची ठरू लागली आहे. क्रू मेंबर १० मिनिटांत येईल म्हणून प्रवाशांना दी़ड तास विमानातच बसवून ठेवणाऱ्या इंडिगोवर प्रवाशांचा रोष ओढवू लागला आहे. सोमवारी दाट धुक्यामुळे तासंतास बसवून ठेवणाऱ्या इंडिगोच्या वैमानिकावर एका प्रवाशाने हल्ला केला होता. आता …

Read More »

शिल्पकार योगीराज यांच्या ‘राम लल्ला’ मूर्तीची होणार प्रतिष्ठापना

  श्री रामजन्मभूमी ट्रस्टची अधिकृत घोषणा बंगळूर : अयोध्येतील राम मंदिरातील ‘राम लल्ला’ मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेबाबत आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ज्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली ‘राम लल्ला’ मूर्तीची २२ जानेवारी रोजी होणाऱ्या समारंभात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने …

Read More »