Thursday , April 23 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांच्या वतीने सुचित केल्याप्रमाणे या भाषा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचा उद्घाटन सोहळा मराठी विद्यानिकेतन येथे उत्साहात संपन्न झाला. मराठीचे तज्ञशिक्षक श्री. सी. वाय. पाटील यांच्या हस्ते या भाषा पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिटणीस सुभाष ओऊळकर, मालोजी अष्टेकर, इंद्रजीत मोरे व एन सी उडकेकर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांच्या फोटोचे पूजन करून या भाषा पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुभाष ओऊळकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख हर्षदा सुंठणकर यांनी करून दिली. यानंतर श्री. सी. वाय. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपली मराठी भाषा, तिचा इतिहास, मराठी भाषेतील साहित्य, आजच्या विद्यार्थ्यांनी या साहित्याचे करायचे वाचन, त्याचबरोबर आजच्या काळात मराठी भाषेच्या संवर्धनाचे महत्त्व याविषयी सी. वाय. पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. या भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कथाकथन, हस्ताक्षर, काव्यवाचन, लेखक आपल्या भेटीला, हस्तलिखित, निबंध लेखन, वाचन कट्टा, अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी या सर्व उपक्रमांच्या मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन प्रबोधनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे. कार्यक्रमाला सुरेश गडकरी, शंकर चौगुले, आर वाय पाटील, बी बी शिंदे, बसवंत शहापूरकर, प्रसाद सावंत, धीरजसिंह राजपूत, मराठी विद्यानिकेतनचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन इंद्रजीत मोरे व आभार गजानन सावंत यांनी मांडले.

About Belgaum Varta

Check Also

स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love  बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *