Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावचा हॉकी संघ म्हैसूरला अ.भा. निमंत्रित कपसाठी रवाना

Spread the love

 

बेळगाव : हॉकी बेळगावचा संघ हॉकी म्हैसूर येथे आयोजित 18 ते 21 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय निमंत्रित कपसाठी आज निवड करण्यात आला. संघाला शुभेच्छा देण्यासाठी लेले मैदानावर समारंभ आयोजित करण्यात आला होता,
तसेच यावेळी हॉकी बेळगावतर्फे खेलो इंडिया स्पोर्ट्स अथाॅरिटी आॕफ इंडिया हॉस्टेलसाठी 10 मुलींची मडीकेरी येथील निवड चाचणीसाठी रवाना करण्यात आली.
भारताला चार ऑलिंपिक हॉकीपटू दिले असून बेळगावात हॉकीची परंपरा आहे याकरिता हॉकी खेळाकडे लक्ष देऊन आपला प्रभाव पाडावा असे आवाहन अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी याप्रसंगी बोलताना केले.
यावेळी अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर, विनोद पाटील, दत्तात्रय जाधव, उत्तम शिंदे, संजय शिंदे, वेंकटेश महारेड्डी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *