Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

तालुका समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

  बेळगाव : पहिल्या स्त्री शिक्षिका, आद्य समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः आपल्या पत्नीला शिक्षण देऊन नंतर समाजामध्ये पुण्यामध्ये स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढून या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांना पहिली शिक्षिका म्हणून रुजू केले होते. तेव्हापासून स्त्री शिक्षणाला सुरुवात …

Read More »

पत्नीचा खासगी व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणारा पती पोलिसांच्या ताब्यात

  बेळगाव : पत्नीला घटस्फोट न दिल्यास अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करू, अशी धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची घटना बेळगाव शहरात घडली आहे. शहरातील रहिवासी असलेल्या किरण पाटील याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला असून तो दुसऱ्या महिलेशी लग्न करणार होता. तसेच, खासगी क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची …

Read More »

मराठी विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 28, 29 व 30 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्राथमिक विभाग स्नेहसंमेलन दि. 28 डिसेंबर रोजी बालवाडी ते 3री इयत्तांचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्यातील उपक्रमाशील शिक्षक श्री. मोहन पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची …

Read More »

बेकवाड येथे विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने युवकाचा जागीच मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील बेकवाड येथे शेतवडीतील बोअरवेल सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव ज्ञानेश्वर चांगप्पा माळवी (वय 34) राहणार झुंजवाड असे आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर माळवी हे आपल्या …

Read More »

बेळगावात अंगणवाडी मदतनीस महिलेवर हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावातील अंगणवाडी मदतनीस सुगंधा मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्ह्यात महिलांना संरक्षण मिळत नसल्याचा संताप निदर्शकांनी व्यक्त केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे नेते जी. एम. जैनेखान यांनी सांगितले की, …

Read More »

पिरनवाडी नगर पंचायतीला ग्रामस्थांचा घेराव

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी नगर पंचायतीकडून मालमत्तांचे कॉम्युटर उतारे देण्यासाठी रहिवाशांकडून हजारो रुपये उकलण्यात येत असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी आज नगरपंचायतीला घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला. बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी ग्राम पंचायतीचा दर्जा वाढवून नगरपंचायतीचा दर्जा दोन वर्षांपूर्वी देण्यात आलाय. मात्र नगरपंचायत झाल्यापासून रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी त्यात वाढच झाल्याचा …

Read More »

आधुनिकते बरोबर नैतिकतेचा वारसा जपा : डॉ. सरिता मोटराचे

  बेळगाव : बेळगांव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘बालिका दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.मजगांव येथील एस.एन.के. पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मराठी प्राध्यापिका डॉ. सविता मोटराचे या प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी भूषविले …

Read More »

वेदगंगा नदीकाठच्या लोकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  कोगनोळी : वेदगंगा नदी काठ बचाव कृती समिती यांच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना मांगुर फाटा वेदगंगा नदीवरील पूल भराव हटवून पिलर पुल बांधण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले. पावसाळ्यामध्ये वेदगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने व नदीकाठच्या गावात पाणी येत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. …

Read More »

येळ्ळूर सरकारी शाळेला किर्तीकुमार माने यांची देणगी

  बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळाला किर्तीकुमार श्रीराम माने यांनी आज सावित्रीबाई फुले जयंती दिनी आपल्या स्वर्गवासी मातोश्री कै. सुधा श्रीराम माने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शाळेच्या स्लॅबवरील शेडसाठी विद्युत रोषणाईचे साहित्य देणगी दाखल दिले. सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याची ओळख शाळेच्या …

Read More »

उचगाव मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम 8 जानेवारी रोजी

  उचगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी यांच्या विद्यमाने रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या 22 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाची मुहूर्तमेढ कार्यक्रम सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9 वाजता या भागातील जागृत असे मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्योदय …

Read More »