Monday , September 21 2026
Breaking News

आधुनिकते बरोबर नैतिकतेचा वारसा जपा : डॉ. सरिता मोटराचे

Spread the love

 

बेळगाव : बेळगांव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘बालिका दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.मजगांव येथील एस.एन.के. पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मराठी प्राध्यापिका डॉ. सविता मोटराचे या प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी भूषविले होते.
सावित्रीबाई या स्त्री शिक्षणांच्या पहिल्या शिक्षिका होत्या. सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणाच्या प्रयत्नातून सनातन मूल्यांच्या मध्ये परिवर्तन होऊन स्त्रीला न्याय मिळाला. आज स्त्री समाजात मानाने डोलावते, परंतु आधुनिकतेच्या विळख्यात सापडून ती नैतिकतेला विसरत आहे. आधुनिकते बरोबर नैतिकतेला जोपासण्याचा वारसा हीच सावित्रीबाईंची खरी आठवण ठरेल असे प्रतिपादन आपल्या ओजस्वी भाषणातून डॉ. सरिता मोटराचे यांनी अभिव्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. आरती जाधव यांनी प्रस्तावना मांडून उपस्थितांचे स्वागत केले. तद्नंतर मराठी विभाग प्रमुख डॉ. वृषाली कदम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी म्हणाले शिक्षणाच्या मुळेच आज स्त्रीमध्ये अमूल परिवर्तन घडत आहे. आज स्त्री अनेक क्षेत्रात शिक्षणामुळेच आपले नांव लौकिक कमावित आहे.स्त्री शिक्षणामुळेच परिवार आणि समाजाला एक शक्ती प्राप्त होते.
कार्यक्रमाच्या शेवटी ऐश्वर्या पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिया अनगोळकर यांनी केले.या कार्यक्रमाला अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *